VIDEO : दीड किमीची पायपीट, शेतात जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची कोळपणी

| Updated on: Jun 25, 2019 | 11:24 AM

वानरवाडी गावाच्या परिसरात तलावाच्या उद्घाटनावेळी एक दीड किलोमिटर पायपिटी करत, डोंगरी भागातील काढलेल्या शिवारफेरीत, पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट शेतात जाऊन शेतात राबणाऱ्या शेतकरयांशी संवाद साधला.

VIDEO : दीड किमीची पायपीट, शेतात जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची कोळपणी
Follow us on

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतशिवार फेरी करत, कोळपणी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सुट्टीच्या दिवशी कराड दक्षिण मतदारसंघात हजेरी लावली. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून, त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघात विविध विकासकामांची उद्घाटने केली.

वानरवाडी गावाच्या परिसरात तलावाच्या उद्घाटनावेळी एक दीड किलोमिटर पायपिटी करत, डोंगरी भागातील काढलेल्या शिवारफेरीत, पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट शेतात जाऊन शेतात राबणाऱ्या शेतकरयांशी संवाद साधला. डोंगरी विभागातील धूळवाफेवर पेरणी केलेल्या पिकाबाबत, पाऊस- पाणी, तसेच शेतीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी कोळपा चालवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

शिवार फेरीत स्थानिक लोकांकडून डोंगरदऱ्यातील नैर्सगिक पाण्याच्या पारंपारिक स्त्रोतांची माहितीही घेतली.

VIDEO: