नवी दिल्ली: एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने हाथरसचे एसपी, डीएसपी आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यूपी सरकारच्या या कारवाई वर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टीका केलीय. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे फोन कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करा. पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन जबाबदारी झटकू नये, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली. (Priyanka Gandhi demands resignation of Yogi Aadityanath)
“योगी आदित्यनाथ जी काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? हाथरसची पीडिता, तिच्या कुटुंबाला भयानक परिस्थितीला कुणाच्या आदेशावरून सामोरे जावे लागले?, हाथरसचे जिल्हाधिकारी एसपी यांचे फोन कॉलवरील संभाषण सार्वजनिक करा.मुख्यमंत्रीजी तुम्ही तुमच्या जबाबदारीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करु नये. देश आपल्याला बघत आहे, तुम्ही राजीनामा द्या.”, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.
.@myogiadityanath जी कुछ मोहरों को सस्पेंड करने से क्या होगा? हाथरस की पीड़िता, उसके परिवार को भीषण कष्ट किसके ऑर्डर पर दिया गया? हाथरस के डीएम, एसपी के फोन रिकार्ड्स पब्लिक किए जाएँ। मुख्यमंत्रीज अपनी जिम्मेदारी से हटने की कोशिश न करें। देश देख रहा है @myogiadityanath इस्तीफा दो
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 2, 2020
हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर , पोलीस उपअधीक्षक तसंच पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना योगी सरकारने निलंबित केलं आहे. त्यांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. तसंच हाथरस पोलीस स्थानकातील सगळ्या पोलिसांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. पीडितेच्या कुटुंबाची देखील नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.
उत्तर प्रदेश मुख्यमंत्री द्वारा पुलिस अधीक्षक विक्रांत वीर, तत्कालीन क्षेत्राधिकारी राम शब्द, तत्कालीन प्रभारी निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, वरिष्ठ उप निरीक्षक जगवीर सिंह व हेड मोहर्रिर महेश पाल को निलंबित करने के निर्देश दिए गए हैं। https://t.co/wo4US0suxS pic.twitter.com/kUWlHWlpBP
— ANI_HindiNews (@AHindinews) October 2, 2020
दरम्यान, हाथरस प्रकरणावरुन देशभरात संताप व्यक करण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन पीडितेच्या गावाकडे निघाले असता त्यांना देखील पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना यूपी पोलिसांनी त्यांना अडवत अटक केली होती.
संबंधित बातम्या:
प्रचंड दबावानंतर योगी सरकारची कारवाई, हाथरसचे SP, DSP यांच्यासह बडे अधिकारी निलंबित
योगीजी, माध्यमांसह राजकीय नेत्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू द्या, उमा भारतींची विनंती
Priyanka Gandhi demands resignation of Yogi Aadityanath