नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.(Priyanka Gandhi questions Prime Minister Narendra Modi on farmers’ issue)
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. ‘नव्या संसदेसाठी केंद्र सरकारचे 20 हजार कोटी रुपये आहेत. पंतप्रधानांसाठी विशेष विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी रुपये आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे 14 हजार कोटी रुपये नाहीत. 2017 पासून उत्तर प्रदेशात उसाचा भाव वाढला नाही. हे सरकार फक्त अब्जाधिशांपुरताच विचार करतं,’ असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केलाय.
भाजपा सरकार के पास
?20,000 करोड़ का नया संसद कॉरिडोर बनाने
?16,000 करोड़ का पीएम के लिए स्पेशल जहाज खरीदने का पैसा है।लेकिन यूपी के गन्ना किसानों को 14000 करोड़ भुगतान कराने का पैसा नहीं है। 2017 से गन्ने का मूल्य नहीं बढ़ा है।
ये सरकार केवल अरबपतियों के बारे में सोचती है pic.twitter.com/KwEa7f8PY4
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 7, 2020
सरकारने अहंकाराची खुर्ची सोडून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यायला हवा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधी यांनी ट्वीट केलंय. ‘अन्नदाता रस्ते-मैदानावर धरणं देत आहे आणि ‘खोटे’ टीव्हीवर भाषण. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं ऋण आपल्यावर आहे. हे ऋण त्यांना न्याय आणि त्यांचे अधिकार देऊनच उतरवलं जाईल. त्यांच्यावर लाठीमार करुन, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून ते ऋण उतरलं जाणार नाही’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.
अन्नदाता सड़कों-मैदानों में धरना दे रहे हैं,
और
‘झूठ’ टीवी पर भाषण!किसान की मेहनत का हम सब पर क़र्ज़ है।
ये क़र्ज़ उन्हें न्याय और हक़ देकर ही उतरेगा, न कि उन्हें दुत्कार कर, लाठियाँ मारकर और आंसू गैस चलाकर।
जागिए, अहंकार की कुर्सी से उतरकर सोचिए और किसान का अधिकार दीजिए।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 1, 2020
“8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,” असं पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
संबंधित बातम्या:
FARMER PROTEST | शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, टीआरएस आणि ‘आप’चा पाठिंबा
Priyanka Gandhi questions to PM Narendra Modi in farmer issue