मुंबई: जगभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेनटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जातो. मात्र त्याआधी सात दिवसापासूनच आठवडाभर विविध डे साजरे केले जातात. गुरुवारी रोज डे ने व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली. व्हॅलेनटाईन म्हटलं की, तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. महाविद्यालयीन तरुणांमध्ये व्हॅलेनटाईन डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रोज डे नंतर प्रपोज डे साजरा केला जातो. प्रत्येकाची इच्छा असते आपल्या पार्टनरने हटके पद्धतीने आपल्याला प्रपोज करावं. प्रपोज डेच्या निमित्ताने लोक आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. प्रेमाच्या भावना व्यक्त करणे हे खूप कठीण काम असतं म्हणून बऱ्याचदा लोक प्रपोज करणं टाळतात. मात्र आता परफेक्ट वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करा, त्यासाठी या खास टिप्स-
प्रपोज करण्याच्या काही सोप्या टीप्स
बी युअरसेल्फ
जर तुम्ही कुणाला प्रपोज करायला जात असाल, तर हा नियम नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्यामध्ये अनेक गोष्टींचा बदल करावा लागेल. आपण आहे तसेच राहा, प्रपोज करण्यासाठी स्वत:मध्ये बदल करु नका. फक्त तुमचे व्यक्तीमत्व, आत्मविश्वास वाढवा. प्रपोज करणार तेव्हा आत्मविश्वास आणि प्रेमाने समोरच्याचे मन जिंका.
कँडल लाईट डिनर
ही खूप जुनी पद्धत आहे, मात्र आजही तिला खूप महत्त्व आहे. रोमँटिक संध्याकाळ यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. कँडलचा प्रकाश, रोमँटिक म्युझिकच्या वातावरणात प्रपोज करणे ही एकदम योग्य वेळ असते.
कॉफी डेट
एका कॉफीवर बरच काही होऊ शकते. कॅफे कॉफी डेची टॅगलाईनसुद्धा हे सांगते आणि हे खरं आहे. तुमच्या क्रशला कोणत्याही कॉफी शॉपमध्ये घेऊन जा आणि वेळ आली की तुमच्या मनातील गोष्ट तिला सांगून टाका.
रिअल लाईफमध्ये बदल करा
रिअल लाईफमध्ये बऱ्याचदा सरप्रायझिंग प्रपोजल दिसतात. जर तुम्हाला प्रपोज करता येत नसेल किंवा बोलताना अडकत असाल, तर तिला सिनेमा पाहण्यासाठी घेऊन जा. मात्र तुम्ही प्रपोज करणार याची तिला कल्पना नसावी आणि ज्यावेळी स्क्रीनवर रोमँटिक सीन सुरु असेल तेव्हा तुम्ही तिला प्रपोज करु शकता.
बॉनफायर पार्टी
कोणत्या मित्राच्या फार्महाऊसवर एक बॉनफायर पार्टी आयोजित करु शकता. तिथे तुमच्या मित्रांनाही घेऊन जाऊ शकता. यावेळी सर्वांसमोर हटके पद्धतीने तुम्ही तिला प्रपोज करु शकता. यावेळी रोमँटिक गाणं डेडिकेट करुन हटके अंदाजात प्रमे व्यक्त करु शकता.