पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा उद्रेक (Pune Additional Restrictions) वाढत आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे (Corona Virus) 1 हजार 120 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 82 जणांना आपाल जीव गमवावा लागला आहे. सर्वतोपरी प्रयत्न करुनही पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता पुण्यात सोशल डिस्टन्सिंगचे कोटकोरपणे पालन व्हावे यासाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध (Pune Additional Restrictions) लावण्यात आले आहेत.
पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत. 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मेपर्यंत रात्री 24 वाजेपर्यंत हे अतिरिक्त निर्बंध असणार आहेत. सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
अतिरिक्त निर्बंध लागू केलेल्या ठिकाणी किराणा, भाजीपाला, फळं, चिकन, मटण, अंडी यांची विक्री, दुकानं वितरण सेवा पूर्ण बंद राहील. तर दूध विक्री केंद्र दिवसभरात केवळ दोन तास सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहील. तर घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वेळेच बंधन असेल. मात्र दुधाच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नाहीत (Pune Additional Restrictions).
पुण्यातील ‘या’ भागात अतिरिक्त निर्बंध
परिमंडळ 1
1) समर्थ पोलीस स्टेशन
2) खडक पोलीस स्टेशन
3)फरासखाना पोलीस स्टेशन
परिमंडळ 2
1)स्वारगेट पोलीस स्टेशन
2)लष्कर पोलीस स्टेशन
3)बंडगार्डन पोलीस स्टेशन
4) सहकार नगर पोलीस स्टेशन
परिमंडळ 3
1) दत्तवाडी पोलीस स्टेशन
2) पर्वती दर्शन परिसर,
परिमंडळ 4
1) येरवडा पोलीस स्टेशन
2) खडकी पोलीस स्टेशन
पुण्यात अतिरिक्त निर्बंध लागू होण्याची ही दुसरी वेळ
पुण्यात यापूर्वीही दोन दिवसांसाठी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले होते. पुण्यात 22 ते 23 एप्रिलदरम्यान अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले होते. पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे निर्बंध लागू करण्यात आले होते.
Maharashtra Corona Update | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार, कुठे किती नवे रुग्ण?https://t.co/YVXYXfq5yn #MaharashtraFightsCorona #Maharashtra #coronavirusinindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 30, 2020
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारच्या पार
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या पार पोहोचला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुण्यासह, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा अक्षरशः हाहा:कार माजला आहे. आज (30 एप्रिल) दिवसभरात कोरोनाचे 126 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 043 वर पोहोचला आहे.
Pune Additional Restrictions
संबंधित बातम्या :
पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन
पुण्यात कोरोनाबाधित पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालय, पोलीस आयुक्तांचा निर्णय
आधी चार महिन्याच्या बाळाचा कोरोनावर विजय, आता पुण्यात पन्नाशीवरील 7 ज्येष्ठांनी कोरोनाला हरवलं