नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालशक्ति पुरस्काराने गौरवलेला पुण्याचा चिराग फलोर JEE Advance 2020 परीक्षेत अव्वल आला आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुंबई झोनमधून चिराग फलोरने देशात चमकदार कामगिरी केली. (Pune boy Chirag Falor bags top rank in the JEE-Advanced whom PM Narendra Modi conferred with Bal Shakti Award)
‘बाल पुरस्कार प्राप्त असलेला माझा मित्र चिराग फलोरला भेटा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान स्पर्धांचा तो विजेता आहे. खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. चिरागचे भविष्य उज्ज्वल आहे आणि मी त्याला यशासाठी शुभेच्छा देतो.’ असे ट्वीट चिरागच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जानेवारीला केले होते.
चिराग फलोर याचा परिचय
चिराग फलोर याचा जन्म 26 ऑगस्ट 2002 रोजी झाला. त्याला विज्ञान आणि खगोलशास्त्राची आवड आहे. अमेरिकन गणित स्पर्धेत (एएमसी-10) 2019 मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त करुन त्याने देशाची मान अभिमानाने उंचावली होती. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतही त्याने प्रशंसनीय कामगिरी केली होती. हंगेरीतील केजेथेली येथे 2019 मध्ये आयोजित अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात त्याला बालशक्ति पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले होते.
Meet my friend Chirag Falor, a Bal Puraskar awardee. Winner of national and international math and science competitions, he represented India in the International Olympiad Award on Astronomy and Astrophysics. Chirag has a bright future ahead and I wish him success. pic.twitter.com/B2YPdIsWb3
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2020
IIT मुंबई झोनमधून चिराग फलोर याने सामान्य श्रेणीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. तर कनिष्का मित्तल या विद्यार्थिनीने सामान्य श्रेणीत 17 वा आणि महिलांच्या यादीत पहिला येण्याचा मान मिळवला. तिला 396 पैकी 315 गुण मिळाले आहेत.
संबंधित बातमी :
JEE Advance परीक्षेचा निकाल जाहीर, 43 हजार विद्यार्थी उत्तीर्ण
(Pune boy Chirag Falor bags top rank in the JEE-Advanced whom PM Narendra Modi conferred with Bal Shakti Award)