कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं प्लॅनिंग

| Updated on: Jul 09, 2020 | 5:20 PM

"कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम (Naval Kishor Ram on Pune corna Patient) करा"

कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं प्लॅनिंग
Follow us on

पुणे : “कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम (Naval Kishor Ram on Pune corna Patient) करा”, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज (9 जुलै) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सचूना (Naval Kishor Ram on Pune corna Patient) दिल्या.

“जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांना मिशन मोडवर काम करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. छावणी परिषद, हवेली तालुका तसेच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी विशेष लक्ष द्या”, असं नवल किशोर राम यांनी बैठकीत सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागात कंटेन्मेंट झोन तयार करा. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि तपासणी प्रभावीपणे करा. कोरोना तपासणी अहवाल लॅबकडून 24 तासात मिळण्यासाठी प्रयत्न करा”, असंही नवल किशोर राम यांनी सांगितले.

“शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती घेवून हा अहवाल नियंत्रण कक्षाला वेळोवेळी कळवा. रुग्णांना बेड जलदगतीने मिळवून देण्यासाठी नियोजन करा. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित इंसिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी यांच्या समन्वयाने आवश्यक त्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवा”, अशा सूचनाही नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“उपाययोजना राबवताना गावातील उद्योग आस्थापनांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्या”, अशी सूचनाही नवल किशोर राम यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona | आणखी चार अधिकारी दिमतीला, अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन

Corona Special Report | लोकप्रतीनिधींना कोरोनाचा विळखा, पुणे मनपा कोरोनाचं हॉटस्पॉट!