पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओकडे केला आहे (Pune Private Ambulance). एकूण पाचशे रुग्णवाहिका अधिग्रहित करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव आरटीओकडे दिला आहे (Pune Private Ambulance).
पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएलच्या 60-65 बसेसचा रुग्णवाहिकांसाठी वापर करण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात रुग्णवाहिका संख्या वाढवण्याचा प्रयत्न सध्या स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
जिल्ह्यात सध्या 461 सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. पुणे शहरात 215, पिंपरी चिंचवड 115 आणि ग्रामीण भागात 131 रुग्णवाहिका आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक रुग्णालयाकडे स्वतःच्या 2 ते 4 रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे सध्या रुग्णवाहिका पुरेशा आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या रुग्णवाहिका वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ग्रामीण भागात 131 सरकारी रुग्णवाहिका असून आणखी रुग्णवाहिकांची गरज आहे. आर्थिक दृष्ट्या सबळ असणाऱ्या रुग्णवाहिकांना ग्रामपंचायत स्वतःच्या गावासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड?’ भीम आर्मीचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन