Pune Corona | पुण्यात दिवसभरात 6 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा साडे 6 हजारांच्या पार

| Updated on: Jun 02, 2020 | 12:10 AM

आज दिवसभरात 57 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 529 वर गेला आहे.

Pune Corona | पुण्यात दिवसभरात 6 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा साडे 6 हजारांच्या पार
Follow us on

पुणे : पुण्यात आज दिवसभरात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला (Pune Corona Cases Latest Update) आहे. त्यामुळे पुणे मनपा हद्दीतील कोरोनाबळींची संख्या आता 320 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 57 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 529 वर गेला (Pune Corona Cases Latest Update) आहे.

पुण्यात आज 168 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3,950 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 2,259 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 174 रुग्ण क्रिटिकल आहेत. तर 46 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांवर ससून रुग्णालय, नायडू रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता या भागाची पुनर्रचना होणार आहे.

पुण्यात ‘मिशन बिगेन अगेन’ला सुरुवात

लॉकडाऊनचा पाचवा टप्पा जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होणार आहेत. राज्यात ‘मिशन बिगेन अगेन’ राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. रोज रात्री 9 वाजेपासून ते दुसऱ्यादिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. 1 जून ते 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

Pune Corona Cases Latest Update

या काळात कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, गल्लोगल्ली, सायकल तसेच वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर तीन चाकी, हलकी वाहने, जड वाहतुकीची वाहने वापरण्यास परवानगी नाही. या कालावधीत प्रवास करण्यास, वाहतूक करण्यास, पायी फिरण्या, उभे राहण्या आणि रेंगाळण्यास मनाई करण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी हे आदेश दिले आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

राज्यात आज कोरोनाचे 2 हजार 361 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 13 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 76 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 2,362 इतकी झाली आहे. दिवसभरात 779 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 30 हजार 108 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 37 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरुआहेत.

Pune Corona Cases Latest Update

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जामीन द्या, मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरचा अर्ज, कोर्टाकडून मंजुरी

पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार, ज्येष्ठ नागरिक-महिलांना प्रवेशबंदी

Dhule Corona | धुळे शहरात सक्तीची संचारबंदी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाचा निर्णय