पुणे : पुणे जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 205 नवीन (Pune Corona Cases Update) कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 5 हजार 899 वर गेली आहे. आज दिवसभरात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 276 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. काल (24 मे) रात्री 9 वाजेपासून ते आज सायंकाळी (25 मे) 4 वाजेपर्यंतची ही (Pune Corona Cases Update) आकडेवारी आहे.
नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!https://t.co/ldXOXxAlhP #Nagpur #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2020
जनता वसाहतीत रुग्ण संख्या 50 वर
पुण्यातील जनता वसाहतमध्ये नवीन चार कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत आतापर्यंत 50 बाधित रुग्ण झाले आहेत. तर चार बाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे (Pune Corona Cases Update). सिंहगड परिसरात आतापर्यंत 95 कोरोनाबाधित रुग्ण असून 57 जण क्वारंटाईन आहेत. मात्र, या परिसरात आज स्वॅब घेण्याचे काम थांबवण्यात आलं आहे. लॅब बंद असल्याचं कारण सांगितले जात असल्याने रुग्णांना फटका बसण्याची भीती आहे.
पुणे शहरात दिवसभरात 399 कोरोनाबाधित नवे रुग्ण
पुणे शहरात सोमवारी तब्बल 399 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली. आतापर्यंतचे एका दिवसातील ही विक्रमी नवीन रुग्णवाढ आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या रुग्णांच्या संख्येने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. पाच हजार 181 वर बाधित रुग्णांची संख्या पोहोचली. तर दिवसभरात दहा बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळं आतापर्यंत 264 बाधित रुग्ण दगावलेत. तर दिवसभरात 175 रुग्ण डिस्चार्ज झाले. आतापर्यंत 2735 रुग्ण डिस्चार्ज झाले असून ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात सध्या 2182 ॲक्टिव रुग्ण असून 179 क्रिटिकल आणि 44 व्हेंटिलेटरवर आहेत.
पुण्यात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळं मृत्यूला कसं रोखायचं हा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य विभागाला भेडसावत आहे.
संबंधित बातम्या :
कोल्हापुरात कोरोनाबाधितांचा आकडा 409 वर, दहा दिवसात 378 रुग्णांची नोंद