पुणे : पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या (Pune Corona Death Rate Update) आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण काही केल्याने कमी होताना दिसत नाही. त्यातच, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. 30 एप्रिलपर्यंत पुण्याचा मृत्यूदर राज्यातच नाही, तर देशात सर्वाधिक असल्याचं आढळून आलं आहे. देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या (Pune Corona Death Rate Update) महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,828 असून मृतांच्या संख्येने शतक गाठलं आहे. त्यापैकी 93 मृत हे एकट्या पुणे शहरातील आहेत. दुसरीकडे पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 1611 इतकी झाली आहे. मृतांची संख्या वाढल्याने पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे.
पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने रांगा, मूळगावी जाण्यासाठी भर उन्हात गर्दीhttps://t.co/sWiwhm1jUy #PuneFightsCovid19 #Lockdown3
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2020
पुण्याचा मृत्यूदर किती?
पुण्याचा मृत्यूदर 30 एप्रिलपर्यंत 5.6 टक्के होता. तर महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.4 टक्के आणि देशाचा मृत्यूदर 3.3 टक्के होता. म्हणजेच देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर राज्यासह देशात सर्वाधिक आहे. आकडेवारीनुसार, देशाच्या मृत्यूदरापेक्षा (Pune Corona Death Rate Update) पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्क्यांनी जास्त आहे.
भारतात आतापर्यंत एकूण रुग्ण 33 हजार 50 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 1,074 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 9 हजार 915 कोरोनाचे रुग्ण असून 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात एकूण 1,518 कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजारांच्या पार
महाराष्ट्रात 1 मे रोजी एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Pune Corona Death Rate Update
कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
मिरा भाईंदरमध्ये 3 वर्षांच्या चिमुरडीसह एकाच दिवसात 56 रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक प्रशासनाने करुन दाखवलं, मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना, एका डब्ब्यात 54 प्रवासी
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?