पुणे : पुण्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत (Pune Corona Deaths) चालला आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 235 वर येऊन पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक 14 रुग्णांचा मृत्यू हा रेकॉर्डब्रेक (Pune Corona Deaths) आकडा आहे.
पुणे जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 235 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर जिल्ह्यात 245 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 4,544 वर पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यात आज 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 2 हजार 023 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. पुणे शहरात सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात 1,656 बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 165 रुग्ण क्रिटिकल असून 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
मृत रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ससून रुग्णालयातील आहेत. ससूनमध्ये आज दिवसभरात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकट्या ससून रुग्णालयात कोरोनामुळे 119 जणांचा मृत्यू झाला आहे.
Pune Corona | पुण्यात कोरोनाचा थरार, अवघ्या 7 तासात 8 जणांचा मृत्यू, तर तब्बल 94 रुग्ण वाढलेhttps://t.co/zA2NCeTnwD@PMCPune #PuneFightsCorona #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
पुणे विभागात कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजारांच्या पार
पुणे विभागातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 5 हजार 347 वर पोहोचला आहे. पुणे विभागात 2 हजार 475 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत विभागात कोरोनाबाधित 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 187 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत ((Pune Corona Deaths))
पुणे विभागात दिवसभरात कुठे किती रुग्णांची वाढ
राज्यात कोरोनाचे 2 हजार 250 नवे रुग्ण
राज्यात आज (20 मे) दिवसभरात तब्बल 2 हजार 250 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर पोहोचला आहे. राज्यात आज 697 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 10 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 26 हजार 581 रुग्णांवर उपाचार सुरु आहे. राज्यात कोरोनामुळे आज दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 1390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Pune Corona Deaths
राज्यात कुठे किती रुग्ण?
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
पुण्यात नव्या लॅबसाठी परवानगी द्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
चिंचवडमधील हॉटस्पॉट आनंदनगरात शेकडो नागरिक रस्त्यावर, जीवनावश्यक वस्तू संपल्याचा संताप
नवा जॉब कसा सर्च करायचा? प्लेसमेंट व्यवस्थित होतील ना?, विद्यार्थ्यांसाठी खास वेबिनार\
Lockdown 4 | पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना, कंटेनमेंट झोन 64 वर, काय आहेत बदल?