पुणे : पुण्यातील कोरोनाग्रस्तांचे आकडे दिवसेंदिवस वाढत असतानाच पुणेकरांना काहीसा दिलासा देणारी एक बातमी आहे. पुण्यात उपचारानंतर बरे होऊन घरी जाणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. पुण्यात सलग सहा दिवसांपासून दररोज 50 पेक्षा अधिक कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसात एकूण 313 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर गेल्या नऊ दिवसात 411 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (Pune Corona Free Patients Increased)
राज्यातील पहिला रुग्ण 9 मार्चला पुणे शहरात आढळून आला. त्यानंतर सातत्याने कोरोनाग्रस्त रुग्णांसोबतच मृतांचा आकडाही वाढत गेला. मात्र गेल्या नऊ दिवसाच्या आढावा घेतल्यानंतर डिस्चार्ज रुग्णांचे प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. पुण्यात एक मेपासून सहा मेपर्यंत डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 587 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यात 99 नवे कोरोना रुग्ण, आकडा 2 हजार 300 वर
डिस्चार्ज रुग्णांचे प्रमाण वाढत असताना उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी होत असल्याचे दिसते. पुण्यात 28 एप्रिलला एकूण 1339 रुग्णांची नोंद होती. त्यापैकी ॲक्टिव रुग्ण 1057 होते. म्हणजेच हे प्रमाण 79 टक्के एवढं होतं.
सहा मे रोजी एकूण 2029 रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी ॲक्टिव रुग्ण 1324 आहेत. म्हणजेच टक्केवारीनुसार हे प्रमाण 65 टक्के इतके आहे. 14 टक्क्यांनी प्रमाणात घट झाल्याचे दिसते.
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची तारखेनुसार संख्या
तारीख – किती जणांना डिस्चार्ज (नवे कोरोनामुक्त)
28 एप्रिल – 27
29 एप्रिल – 27
30 एप्रिल – 44
(Pune Corona Free Patients Increased)
1 मे – 51
2 मे – 53
3 मे – 55
4 मे – 50
5 मे – 52
6 मे – 52
पुणे जिल्ह्यात बुधवारी (6 मे) 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 2,300 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 127 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
९ दिवसात ४११ रुग्ण कोरोनामुक्त !
डॉक्टर्स आणि टीमचे खूप-खूप धन्यवाद !
लढूयात, जिंकूयात !#PuneFightsCorona https://t.co/F2UCpJeoy6— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 7, 2020