पुण्याला कोरोनाचा विळखा, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 589 वर

| Updated on: Apr 18, 2020 | 5:53 PM

पुण्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (18 एप्रिल) संध्याकाळी 4 पर्यंत पुण्यात 9 जणांचे (Pune Corona Positive Patient) रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

पुण्याला कोरोनाचा विळखा, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 589 वर
Follow us on

पुणे : राज्यातील मुंबईनंतर सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुण्यात झालेला (Pune Corona Positive Patient) पाहायला मिळत आहे. पुण्यात आज दिवसभरात 9 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 589 वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात पाहायला मिळत आहे. तर पुण्यात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (18 एप्रिल) संध्याकाळी 4 पर्यंत (Pune Corona Positive Patient) पुण्यात 9 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या 495 वर पोहोचली आहे. तर पिंपरी चिंचवड भागात 52 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय पुणे ग्रामीण मधील कोरोना रुग्णांची संख्या ही 42 वर पोहोचली आहे.

दरम्यान पुण्यात आतापर्यंत 49 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यात सर्वाधिक 40 मृत्यू हे ससून रुग्णालयात झाले आहेत. तसेच या मृतांमध्ये पुणे शहरात 47, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

तर दुसरीकडे पुण्यात आतापर्यंत 52 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात पुणे शहरातील 33 रुग्णांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवडमधील 13 आणि पुणे ग्रामीणमधील 6 जण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडलं आहे.

589 पैकी 491 बाधित रुग्णांचा आढावा, कोणत्या भागात किती रुग्ण?

1. येवलेवाडी धानोरी – 48
2. नगर रोड वडगाव शेरी – 6
3. वानवडी रामटेकडी – 54
4. हडपसर मुंडवा – 21
5. कोंढवा येवलेवाडी – 9
6. बिबवेवाडी – 20
7. भवानी पेठ -130
8. ढोले पाटील – 61
9. कसबा विश्रांतवाडी – 63
10. शिवाजीनगर घोले रोड – 33
11. औंध बाणेर – 3
12. कोथरुड बावधन – 1
13. वारजे कर्वेनगर – 9
14. सिंहगड रोड – 8
15. पुणे बाहेर – 25

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861