Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या पार, 2 हजार 927 रुग्णांना डिस्चार्ज

| Updated on: May 22, 2020 | 7:48 PM

पुणे विभागात पुणे जिल्ह्यात 297, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 46, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 49 इतके रुग्ण आज दिवसभरात वाढले आहेत.

Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांचा आकडा सहा हजारांच्या पार, 2 हजार 927 रुग्णांना डिस्चार्ज
Follow us on

पुणे : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची (Pune Corona Virus Latest Update) संख्या आता 6 हजार 29 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 2 हजार 927 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 295 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला (Pune Corona Virus Latest Update) आहे.

पुणे विभागात पुणे जिल्ह्यात 297, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 46, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 49 इतके रुग्ण आज दिवसभरात वाढले आहेत.

पुणे विभागातील कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पुणे जिल्ह्यात 5,014 कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यातील 5 हजार 14 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोरोनाबाधित 2 हजार 552 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 212 इतकी आहे (Pune Corona Virus Latest Update).

सातारा जिल्ह्यात 201 कोरोनाबाधित

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 201 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 106 बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 90 इतकी आहे. तर कोरोनाबाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात 524 कोरोनाबाधित रुग्ण

सोलापूर जिल्ह्यातील 524 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 218 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 269 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधित 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 62 वर

सांगली जिल्ह्यात सध्या 62 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत 38 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर जिल्ह्यात सध्या 23 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 228 कोरोनाबाधित

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 228 वर येऊन पोहोचली आहे. तर आतकापर्यंत 13 रुग्ण बरे झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 213 इतकी आहे. कोल्हापुरात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Pune Corona Virus Latest Update) आहे.

संबंधित बातम्या :

पुणे जिल्ह्याच्या 11 तालुक्यांमधील कंटेनमेंट झोनची संपूर्ण यादी

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरुच, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत पुन्हा PMPML बस धावणार, प्रवाशांसाठी नियम जाहीर

मुंबईहून शिरुरला आलेले आई-वडील होम क्वारंटाईन, लेकीवर अंत्यविधी करण्यास बंधन