पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 201 वर आली (Pune Ward Wise Corona Patient) आहे. यातील पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा 1,943 वर पोहोचला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. येत्या दोन आठवड्यात पुणे शहरातील कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे शहरातील 15 पैकी 5 क्षेत्रीय कार्यालय परिसरात 73 टक्के कोरोनाबाधित (Pune Ward Wise Corona Patient) रुग्ण आढळले आहेत. यात भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, येरवडा-धानोरी, ढोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरातील एकूण 46 प्रभागापैकी 8 प्रभागात 50 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
पुणे शहरात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता शहरातील 13 प्रयोगशाळांमध्ये 1200 पर्यंत चाचण्यांची क्षमता आहे. मात्र आता ती 1700 पर्यंत वाढवता येऊ शकते, अशी माहिती पुणे जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
हेही वाचा – पिंपरी चिंचवडला ‘कोरोना’चा विळखा, तळवडे-चिखलीत 34 रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?
पुणे शहरात काल (5 मे) पर्यंत सर्व प्रभागात एकूण 1949 रुग्ण आहेत. यातील 1944 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
त्यानुसार पुण्यातील भवानी पेठेत सर्वाधिक 400 रुग्ण आहेत. तर त्यापाठोपाठ ढोले पाटील रोडवरील 322 कोरोना रुग्ण आहेत.
वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या
भवानी पेठ – 433 (सर्वाधिक)
ढोले पाटील – 322
शिवाजीनगर – 243
येरवडा – 217
कसबा – 172
धनकवडी – 124
वानवडी – 104
बिबवेवाडी – 76
हडपसर – 58
नगररोड – 57
कोंढवा – 33
सिंहगडरोड – 16
वारजे-कर्वेनगर – 11
कोथरूड – 5
औंध-बाणेर – 4
पुण्याबाहेरचे – 70
एकूण 1949
पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच
पुणे जिल्ह्यात मंगळवारी (5 मे) 79 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 2,201 वर येऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबळींची संख्या 120 वर गेली आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीत दिवसभरात 65 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1,943 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे पुण्यात दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील मृत्यूंची संख्या 111 वर पोहोचली. तर 76 रुग्ण अतिगंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यातील 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यात सध्या 1,297 रुग्ण अॅक्टिव्ह (Pune Ward Wise Corona Patient) आहेत.
संबंधित बातम्या :
Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती
पुण्याबाहेर जाणाऱ्या 68 हजार जणांची यादी तयार, स्वखर्चाची अट