पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Corona Virus Update) आहे. गेल्या दोन दिवसात पुण्यात 100 हून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 900 च्या वर पोहोचला आहे. तर राज्यात काल (24 एप्रिल) 394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 817 वर पोहचली आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात काल (24 एप्रिल) 960 कोरोनाबाधित रुग्णांची (Pune Corona Virus Update) नोंद करण्यात आली. यापैकी 923 कोरोनाबाधित रुग्णांचा नकाशाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. यातील हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सर्वाधिक जास्त 195 रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण हे कोथरुड बावधन या ठिकाणी आढळले आहेत.
हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात आहे. अंतर्गत गल्लीबोळात नागरिकांची ये-जा सुरुच आहे. नागरिकांना गांभीर्य नसल्यानं धोका वाढण्याची भीती आहे. सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नागरिकांची अपमानास्पद वागणूक मिळत आहे.
वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (शंभरहून अधिक रुग्ण)
वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (शंभरहून कमी रुग्ण)
पुण्यात गेल्या दोन दिवसात शंभरी पार नवीन रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी (23) आणि शुक्रवारी (24 एप्रिल) या सलग दोन दिवसात 100 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. तर काल 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 64 वर पोहोचला आहे.
पुण्यात कोरोनामुळे उपचार घेत असलेल्या 41 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर आतापर्यंत 6 हजार 181 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 5 हजार 264 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.