पुणे : पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोनाबाधित रुग्ण बरे (Pune COVID-19 Update) होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 438 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 4 हजार 428 आहे. आतापर्यंत विभागात कोरोनाबाधित 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 258 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (Pune COVID-19 Update) यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 8 हजार 916 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 5 हजार 412 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 111 आहे. कोरोनाबाधित एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 352 ने वाढ झाली आहे.
कुठे किती रुग्णांची वाढ?
Pune COVID-19 Update
साताऱ्यात कोरोनाचे 597 रुग्ण
सातारा जिल्ह्यातील 597 कोरोनाबाधित रुग्ण असून 251 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 322 आहे. कोरोनाबाधित एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात कोरोनाचे 1,144 रुग्ण
सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 144 कोरोनाबाधित रुग्ण असून 476 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 571 आहे. कोरोनाबाधित एकूण 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगलीत कोरोनाचे 128 रुग्ण
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 128 रुग्ण असून 78 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 46 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापुरात कोरोनाचे 653 रुग्ण
कोल्हापूर जिल्ह्यातील 653 कोरोनाबाधित रुग्ण असून 269 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 378 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकुण 96 हजार 596 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 87 हजार 475 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 121 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 80 हजार 885 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 11 हजार 438 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
VIDEO : Corona Update | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील दुकानं उघडलीhttps://t.co/I4XGydtFTy
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2020
Pune COVID-19 Update
संबंधित बातम्या :
सामनातून आधी टीका आणि नंतर लोटांगण हे नेहमीचं झालं आहे : प्रवीण दरेकर
अधिकारी ते मजूर, पुणे-पिंपरी चिंचवडला जाण्यावर मज्जाव, हवेली तालुका प्रशासनाचे आदेश
कुटुंब नाकारतं…पुण्यातील कोरोनोबळींवर करतात ‘ते’ अंत्यसंस्कार!
पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, आजपासून ‘या’ गोष्टी सुरु होणार