पुणे : एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला. जवळचा मित्रच असा घात करेल तिने कधी स्वप्नातही विचार केला नसावा. एमपीएसची परीक्षेत ऊत्तीर्ण झाल्यावर तिचा सत्कारही झाला होता. ज्यामध्ये तिने भाषणही केलं होतं, मात्र त्यानंतर काही दिवसांनी आरोपी राहुल हंडोरे याने तिला गोड बोलून ट्रेकला नेलं आणि तिची हत्या केली होती. पोलिसांनी फरार झालेल्या आरोपी राहुलला शिताफिने आपल्या जाळ्यात ओढलं. यासाठी त्यांनी त्याला पैसेही पुरवल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी राहुलने दर्शनाला ट्रेकसाठी राजगडावर नेलं आणि तिथे तिची दगडाने ठेचून हत्या केली. हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता, त्यावेळी कुटुंबीयांनी दर्शनाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तर झाला नाही. पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आणि तिचा राजगड गडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला.
दर्शनाचा मृतदेह सापडल्यावर नेमका कोणी आणि कोणत्या कारणामुळे तिचा खून केला गेला. पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचं मोठं आव्हान होतं, पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना सर्वात आधी एक महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्यामध्ये दिसत आहे की राहुल आणि दर्शना गाडीवर एकत्र आले होते. मात्र जाताना राहुल एकटाच गेला होता त्यामुळे राहुलचा पोलिसांनी शोध सुरू केला.
पोलिसांनी तपास सुरू केल्यावर लक्षात आलं की तो फरार आहे. राहुलने पसार झाला होता, पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि त्याच्याच नातेवाईकांचा मोबाईल घेऊन त्याच्याशी संपर्क साधलेला. संपर्क साधल्यावर त्यांनी राहुलला पैशांची काही गरज आहे का? असं विचारलं.
पोलिसांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये तो अलगद सापडला. पोलिसांनी त्याला काही पैसेही पाठवले आणि त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं. त्यामुळे तो कुठे जात आहे याची सर्व माहिती पोलिसांना भेटू लागली. मुंबईमधील अंधेरीमधून तो पुण्याला येत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
राहुल आणि दर्शना एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. राहुलने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र तिच्या घरच्यांनी नकार दिल्याची माहिती आहे. राहुलने याचाच राग मनात ठेवत तिला संपवण्याचं ठरवलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.