पुणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Pune Divisional commissioner On Corona) आहे. पुण्यात आतापर्यंत 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात 32 जणांना कोरोनाबाधित आहेत. ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे. त्यांना काही सोसायटीमधील लोक बहिष्कृत करत आहे. यावर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुण्यातील सर्व सोसायटींना सूचना केली आहे.
“कोरोनाची लागण म्हणजे पाप (Pune Divisional commissioner On Corona) नाही. काही सोसायटी त्या कुटुंबावर बहिष्कार करत आहे. हे दुदैव आहे. जर कोणी असे करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असे दीपक म्हैसेकर म्हणाले. तसेच ज्या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिव पदमुक्त करण्यात येईल,” असेही ते म्हणाले.
CORONA : शिर्डी, अंबाबाई, सिद्धिविनायक मंदिरातील गर्दी ओसरली
“पुण्यात गेल्या 24 तासात पाच नवे संशयित रुग्ण आढळले आहेत. यात अजून 57 संशयित रुग्ण आहेत. यात 315 नवीन सॅम्पल आढळले. तर 294 रिझल्टपैकी 15 वगळता इतर सर्व नेगिटिव्ह आहेत. तर अद्याप 21 जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे,” अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
“दरम्यान जे पाच जण आढळले आहेत. त्यातील चार जण हे परदेशात जाऊन आलेले नाही. हे चौघेही एका रुग्णाच्या जवळचे नातेवाईक आहेत. तर उरलेला एक हा परदेशात जाऊन आला होता. तो 93 जणांच्या ग्रुपसोबत परदेशात गेला होता. यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आम्ही ट्रक केलं आहे. त्यामुळे घरे सोडू नये. पुण्यात 144 कलम लावण्याचा विचार सुरु आहे. लवकरच तो आदेश निघेल,” असेही पुण्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
“त्याशिवाय मॉलमधील भाजीपाला आणि गरजेच्या वस्तूंची दुकाने सुरु झाले आहेत. मात्र कपडे किंवा इतर शॉप बंद राहतील. तसेच ओपन पार्क बंद करण्याचा निर्णय झाला आहे,” असेही विभागीय आयुक्त म्हणाले.
“जे रुग्ण घरात isolation मध्ये आहेत. त्यांना त्रास देऊ नये. जर त्यांना त्रास दिला तर त्याचा इतरांना त्रास होती. जर isolation मध्ये असलेल्या व्यक्तीने ऐकलं नाही तर जबरदस्तीने त्यांना quarantine केलं जाईल,” असेही पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणाले.
Corona Care and Locked Down | लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?
“ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा नसेल विनाकारण फिरु नये, 31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालय बंद राहणार आहे. ज्या ठिकाणी परीक्षा सुरु आहेत. त्या ठिकाणी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास बंधन करणार नाही,” अशीही माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.
“नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हीडिओ conference झाली. त्यात त्यांनी dpdc मधून खर्चाचं नियोजन होणार आहे. निधीची कमतरता नाही. मास्क संदर्भात गरजेएवढा पुरवठा होणार आहे,” असेही दीपक म्हैसेकर म्हणाले.
पुण्यात 15 रुग्ण झाल्यावर नागरिक पॅनिक झाले आहेत. माञ वाढ झाली तरी घाबरण्याचे कारण नाही. सर्व जिल्ह्यात सावधानता बाळगावी. माध्यमांनी यावर भर द्यावा, असेही पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं (Pune Divisional commissioner On Corona) आहे.