पुणे : राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona Virus In Pune) आहे. अमेरिकेहून पुण्यात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्त्यांनी दिपक म्हैसकर यांनी याबाबतची माहिती दिली.
पुणे विभागीय (Corona Virus In Pune) आयुक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 4 मेडिकलवर कारवाई करण्यात आली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा कोणीही अनावश्यक साठा करु नये. जर केल्यास तशी कारवाई करण्यात येईल. सध्या 311 जण निगराणीखाली आहेत.
पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज आहेत. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात नजीकच्या काळातील फॉरेन रिटर्न नागरिकांना कॉरनटाईन केलं आहे. त्यांना काही दिवस आयसोलेट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. असेही पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
कोरोनासंबंधी चुकीची बातमी व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.
कोरोना व्हायरस संदर्भात शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.
यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी (Corona Virus In Pune) सांगितले.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
संबंधित बातम्या
पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर
Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर
Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर
घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक