पुणे : पुण्यात पाच वर्षापूर्वी झालेल्या 50 लाखांच्या घरफोडीची उकल डेक्कन पोलिसांनी नाट्यमरित्या केली आहे. पहिल्याच चोरीत मोठे घबाड हाती लागल्याने दुसऱ्यांचा चोरी करण्यासाठी चोर शिरले. मात्र त्याच वेळी नागरिकांना चोरट्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चोरीच्या पैशातून दोन घरं, चारचाकी गाडी आणि दागिने खरेदी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune five Years thievery mystery solved)
सोमनाथ बनसोडे, सुधाकर बनसोडे असे या दोन चोरट्यांची नाव आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या चोरांनी पाच वर्षापूर्वी याच घरातून 50 लाखांची चोरी केल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी तक्रारदाराने केवळ 5 लाखांची चोरी केल्याचे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराची चौकशी केली. त्यावेळी तक्रारदाराने पत्नीला धक्का बसेल म्हणून 50 ऐवजी पाच लाखाची तक्रार नोंदवल्याचे सांगितले.
पोलिसांनी सर्व रेकॉर्ड तपासले असता त्यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2015 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आलं. या गुन्ह्यात चोरलेले 4 लाख रोख आणि 1 लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे आढळले. मात्र आरोपी स्वत: 50 लाखाची चोरी केल्याचे सांगत होता.
यानंतर दुसऱ्या आरोपीस अटक केल्यावर त्याच्याकडेही याबाबतची चौकशी करण्यात आली. त्यानेही 50 लाखाची चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार गुन्ह्याचा फेर तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत यांच्याकडे देण्यात आला. या तपासात सुधाकर बनसोडेला 50 लाखापैकी 28 लाख रुपये मिळाले होते. तर आरोपी सोमनाथ बनसोडे याने चोरीत 22 लाख मिळाल्याचे सांगितले. त्यातून त्याने भूगाव येथे एक वन बीएके घर घेऊन त्यात फर्निचर, ग्रील अशी कामे केली. त्याशिवाय चोरीतून मिळालेल्या सोन्याचे दागिनेही मोडल्याची कबुली या दोन्ही आरोपीनी दिली.
दरम्यान पोलिसांनी खरेदी केलेली दोन घरे, कार आणि दुचाकी असा 50 लाखाचा ऐवज जप्त केला आहे. त्यानंतर तारण ठेवलेले आणि मोडलेले सोन्याचे दागिने असा 12 लाख 95 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. याची दोन्ही मिळून किंमत जवळपास 62 लाख 95 हजार इतका आहे. (Pune five Years thievery mystery solved)
संबंधित बातम्या :
अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी, पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक
भिवंडीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार