पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्यापणाने साजरा होतो आहे (Ganesh Mandal Decision On Ganeshotsav). यंदा मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्याचबरोबर मंडळांना छोट्या मंडपाला परवानगी देण्याचीही भूमिका घेतली. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना मंदिरात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुण्यातील मानाचे पाच गणपती मंडपात बसणार आहेत (Ganesh Mandal Decision On Ganeshotsav).
पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्यापणाने साजरा केला जातो. यंदा मंडपात नव्हे तर मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मात्र, नियम आणि अटी पाळून मंडळांना छोट्या मंडपाला परवानगी देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, त्याचबरोबर दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने श्रींची प्रतिष्ठापना मंदिरात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मानाचे पाच गणपती हे मंडपात बसणार आहेत.
मानाचे पाच गणपती
1. मानाचा पहिला ग्रामदैवत कसबा गणपती
2. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी
3. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती
4. मानाचा चौथा तुळशीबाग
5. मानाचा पाचवा केसरीवाडा
Ganesh Mandal Decision On Ganeshotsav
मंदिर आणि जागेच्या अभावी पारंपारिक जागेत मंडपात उत्सव होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणपतींचे मंडप उभारण्याचे काम वेगात सुरु आहे. हा मंडप 10 बाय 15 फूटांचा असणार आहे. त्याचबरोबर मंडपात दर्शनाला, देखाव्यांना परवानगी नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनीही या मंडळाना भेट दिली. शक्य असेल त्यांनी मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन गिरिश बापटांनी केलं आहे. त्यामुळे आता काही मंडळांचे गणेशोत्सव मंदिरात तर काहींचा मंडपात होणार आहे.
गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची नियमावली
पुण्यातील गणेश उत्सव संदर्भात पुणे पोलीस प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. यामध्ये गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन करावी, श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत, ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत, त्यांनी प्रतिष्ठापना मंदिरात करावी, छोटे मंडप करिता परवानगी दिली जाईल. मूर्तींची उंची किती असावी याबाबतचे नियम घालून देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी हे नवे नियम जारी केले आहेत.
Pune Ganeshotsav | गणेशमूर्तीची खरेदी ऑनलाईन, मिरवणूक नाही, पुणे पोलिसांची नियमावलीhttps://t.co/mlg42zfuB6@PuneCityPolice #Ganeshotsav
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 17, 2020
Ganesh Mandal Decision On Ganeshotsav
संबंधित बातम्या :
पुणेकरांसाठी खुशखबर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएल बस सेवा सुरु होणार
मंदिरं नसलेल्या गणेश मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी द्या, पुण्यातील गणेशोत्सव समितीची मागणी
पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद, मूर्तीदानाचीही व्यवस्था