पुणे : पुण्यात गांजा आणि चरसची तस्करी करणाऱ्या (Pune Ganja Charas Smuggling) चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या कारवाईत 2 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे कस्टम विभागाने ही धडक कारवाई केली. यावेळी तब्बल 868 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे (Pune Ganja Charas Smuggling).
गांजा तस्करीविरोधात ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत गांजासह 7.5 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. 1 कोटी 4 लाख रुपयांचा गांजा आणि 75 लाख रुपयांचा चरस जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तस्करांनी भन्नाट शक्कल लढवली होती. कंटेनर रिकामा दाखवून टपात गांजा आणि चरस लपवून वाहतूक केली जात होती. आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात हा गांजा वेगवेगळ्या ठिकाणी विकला जात होता.
याबाबतची टीप मिळाल्यानंतर कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचला. नळदुर्ग सोलापूर रोडवर बोरामणी गावाजवळ कारवाई केली. याबाबतचा पुढील तपास सुरु असल्याचं सीमा शुल्क विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे यांनी सांगितलं.
7 राज्यांमध्ये दरोडे, 33 कोटींच्या लुटीचा संशय, पुण्यात महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या 7 आरोपींना जवळपास 5 कोटी मुद्देमालासह बेड्याhttps://t.co/1UV9tKIdjx#Dacoit #Robber #Pune @PuneCityPolice @puneruralpolice @Info_Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2020
Pune Ganja Charas Smuggling
संबंधित बातम्या :