पुणे : लॉकडाऊनच्या काळातही सुरु असलेल्या ड्रग्जच्या तस्करीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला. आलिशान कार आणि शहाळ्याच्या टेम्पोमधून 120 किलो गांजाची तस्करी होत असल्याचं उघड झालं. विशाखापट्टणमहून मुंबईत गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीवर पुण्यात पोलिसांनी धडक कारवाई केली. (Pune Ganja found in Luxurious Car)
आलिशान गाडीच्या डिकीत लपवून गांजाची तस्करी करणारी परप्रांतीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. या गाडीत 48 किलो गांजा आढळला, तर छोट्या टेम्पोमध्ये शहाळ्याच्या खाली लपवलेला 72 किलो गांजा पोलिसांनी पकडला.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन्ही गाडीत मिळून एकूण 120 किलो गांजा जप्त केला. कारवाईत कार, छोटा टेम्पो आणि गांजा असा एकूण 34 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर विशाखापट्टणम ते बडोदा रिटर्न ई पास आणि आंध्र प्रदेश पासिंग असलेली खोटी नंबर प्लेट जप्त करण्यात आली. मुंबईत राहणाऱ्या समीर शेख, हिमायतउल्ला शेख आणि अश्विन दानवे या तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : गांजा, गुटख्यानंतर आता पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त
पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडलं होतं. गांजा, गुटखा, हुक्क्याच्या विक्रीचा प्रकार आतापर्यंत पुण्यात समोर आला आहे. ‘व्हॉट्स हॉट’ या संकेतस्थळावर मोबाईल संपर्क देऊन हुक्क्याची जाहिरात करण्यात आली. संकेतस्थळावर संपर्क करणाऱ्या व्यक्तीला हुक्क्याची घरपोच डिलिव्हरी केली जात होती.
गुटखा विकणारे पुणे पोलिसातील हवालदार
पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनेक गुन्हे घडत असल्याचं समोर आलं आहे. मृत मनपा कर्मचाऱ्याच्या ड्रेस घालून दोन तरुण गांजा आणायला गेल्याचं उघड झाल्यानंतर अवैध गुटखा पकडला होता. धक्कदायक म्हणजे तो आरोपी चक्क पुणे पोलिसातील हवालदार असल्याचं समोर आलं होतं. (Pune Ganja found in Luxurious Car)
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी नाकाबंदीदरम्यान, बेकायदेशीर गुटखा घेऊन पळून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडलं होतं. हे आरोपी पळून जात होते, त्यावेळी त्यांना नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले होते.
मनपा कर्मचाऱ्याचे कपडे घालून गांजा आणायला
पुण्यात एका पठ्ठ्याने अनोखी शक्कल लढवली होती. महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून हा पठ्ठ्या चक्क गांजा आणण्यासाठी गेला होता. पोलिसांनी संशयावरुन पकडल्यानंतर या ‘चरसी’चं बिंग फुटलं. पुणे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती.
Pune Corona | पुण्यात साडे सहा तासात 131 नवे रुग्णhttps://t.co/YN2jKtZDHL#CoronaVirusUpdates #CoronaPandemic #coronainmaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2020
संबंधित बातम्या
लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला, पाठलाग करुन पकडलेला आरोपी निघाला पुणे पोलिसातील हवालदार!
(Pune Ganja found in Luxurious Car)