पुणे : राज्यासह पुण्यातही आज दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे (Pune Ganpati Visarjan). त्यापूर्वी पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक निघेल. सकाळी दहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे (Pune Ganpati Miravnuk). पुण्यातील मानाच्या पहिल्या पाच गणपतींची आरती झाल्यानंतर या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीवर तब्बल सात हजारांपेक्षा जास्त पोलिसांची नजर असणार आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यावर पुणे पोलिसांचा भर आहे.
मिरवणुकीवर पोलिसांसोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे. शहरात तब्बल दोन ते तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर, विसर्जन मार्गावर 200 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवून आहेत. त्याचबरोबर शहरात वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीचंही ही नियोजन करण्यात आलं आहे.
शहरातील 17 रस्ते ठराविक अंतरावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत (Changes in route on Pune roads). यावेळी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोडही तयार करण्यात आला आहे.
पुण्यातील मिरवणुकीदरम्यान वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते
शिवाजी मार्गावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक वाहतूक बंद
बाजीराव रोडवर बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौकापर्यंत वाहतूक बंद
कुमठेकर रोडवर टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौकापर्यंत वाहतूक बंद
गणेश रोड दारूवाला पुल ते जिजामाता चौकापर्यंत वाहतूक बंद
केळकर रोडवर बुधवार चौक ते अलका टॉकीज पर्यंत वाहतूक बंद
टिळक रोडवर जेधे चौक ते टिळक चौकापर्यंत वाहतूक बंद
शास्त्री रोडवर सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज पर्यंत वाहतूक बंद
जंगली महाराज रोडवर जाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौकात वाहतूक बंद
कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौकात वाहतूक बंद
फर्ग्युसन रोडवर खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज में गट पर्यंत वाहतूक बंद
भांडारकर रस्त्यावर पीवायसी जिमखाना ते गुडलक चौकापर्यंत वाहतूक बंद
सातारा रोडवर व्होळगा चौक जेधे चौकात वाहतूक बंद
प्रभात रोडवर डेक्कन पोलीस स्टेशन ते शेलार मामा चौकात वाहतूक बंद
सोलापूर रोडवर सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौकात वाहतूक बंद
संबंधित बातम्या :
Anant Chaturdashi 2019 | गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल?
Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी सज्ज
Anant Chaturdashi 2019 | मुंबईत गणपती विसर्जनासाठी गणेशभक्तांचा उत्साह