पुण्यात कोरोना संदर्भात परस्पर आदेश काढणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीवर गुन्हा दाखल

| Updated on: Jun 29, 2020 | 12:13 AM

सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना प्रशासना व्यतिरिक्त वेगळे आदेश काढण्यास सक्त मनाई होती. मात्र, नीलय सोसायटी सचिवांनी भाडेकरुला मेडिकल सर्टिफिकेटची मागणी केली होती.

पुण्यात कोरोना संदर्भात परस्पर आदेश काढणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीवर गुन्हा दाखल
Follow us on

पुणे : पुण्यात कोरोना संदर्भात परस्पर आदेश काढणाऱ्या (Pune Housing Society Case Filed) गृहनिर्माण सोसायटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंधच्या रोहन निलय-1 या सोसायटीच्या सेक्रेटरी सुनील शिवतारेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना प्रकरणी गृहनिर्माण सोसायटीवर गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याने थेट कारवाई करण्यात आली (Pune Housing Society Case Filed).

सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना प्रशासनाव्यतिरिक्त वेगळे आदेश काढण्यास सक्त मनाई होती. मात्र, नीलय सोसायटी सचिवांनी भाडेकरुला मेडिकल सर्टिफिकेटची मागणी केली होती. सुधीर मेस्सी हे पत्नी आणि मुलांसह कौटुंबिक साहित्य घेऊन राहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना गेटवरच अडवून मेडिकल सर्टिफिकेटची मागणी केली होती. त्याशिवाय, त्यांना सोसायटीत प्रवेश मज्जाव केला होता. परस्पर आदेश काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 25 हजारांच्या वर

पुणे विभागात तब्बल 15 हजार 95 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाल आहेत. विभागात बाधित रुग्णांची संख्या 25 हजार 127 झाली आहे. ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 19 असून 1 हजार 13 रुग्णांचा मृत्यू झाला. 487 रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.07 टक्के आहे. विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. (Pune Housing Society Case Filed)

पुणे विभागात सर्वाधिक जास्त बाधित रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात 20 हजार 577 बाधीत रुग्ण असून 11 हजार 942 रुग्ण बरे झालेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण 7 हजार 937 असून 698 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात 356 रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 58.04 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

तर सातारा जिल्ह्यात 974 रुग्ण असून 711 बाधित रुग्ण बरे झालेत. ॲक्टिव्ह रुग्ण 221 असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 434 रुग्ण असून 1 हजार 515 बाधित रुग्ण बरे झाले. ॲक्टिव्ह रुग्ण 666 असून 253 रुग्णांचा मृत्यू झाला.

सांगली जिल्ह्यात 328 रुग्ण असून 214 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 104 असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 814 रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे झाले. ॲक्टिव्ह रुग्ण 91 असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Pune Housing Society Case Filed

संबंधित बातम्या :

CORONA | पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, आरोग्यमंत्र्यांच्या सूचना, नेमका ‘मुंबई पॅटर्न’ काय?

60 वर्षात पहिल्यांदा गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लॅबला भेट, अनिल देशमुख म्हणतात…