पुण्यात दारुच्या 107 दुकानांना पुन्हा टाळे

| Updated on: May 08, 2020 | 10:54 AM

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रालगत 500 मीटर अंतरावर असलेली 35 वाईन्स शॉप, 32 देशी दारुची दुकानं आणि 40 बिअर शॉपी बंद करण्यात आली आहेत. (Pune Liquor Shops near Containment Zones closed)

पुण्यात दारुच्या 107 दुकानांना पुन्हा टाळे
Follow us on

पुणे : पुण्यात दारुच्या 107 दुकानांना टाळे लावण्यात आले आहे. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्रालगत 500 मीटर अंतरावर असलेली दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Liquor Shops near Containment Zones closed)

प्रतिबंधित क्षेत्राजवळच्या पाचशे मीटर अंतरापर्यंत मद्य विक्री बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार प्रतिबंधित क्षेत्राजवळची 107 मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहेत. 35 वाईन्स शॉप, 32 देशी दारुची दुकानं आणि 40 बिअर शॉपी बंद करण्यात आली आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रात दारु विक्री केली जाणार नाही, त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारांचे लक्ष असणार आहे. सध्या पुणे शहर आणि जिल्हयात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व प्रकारची 785 मद्य विक्री दुकाने सुरु आहेत.

हेही वाचा : एका दिवशी हार्डवेअर, दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम, पुण्यात कोणत्या दिवशी कोणतं दुकान उघडणार?

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातही मद्यविक्री आणि निर्मितीस मंजुरी दिली आहे. मात्र कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम असल्याने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मनपाच्या भागात मद्यविक्रीवर निर्बंध असणार आहेत.

याआधीच पुण्यातील दारुच्या 9 दुकानांवर नियमांचे पालन न केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे होते. परवानगी देताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे आदी नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. मात्र दुकान मालकांनी अटींचा भंग केल्याने पोलिसांनी कारवाई केली.

हेही वाचा : पुणेकरांचा संभ्रम मिटला, ‘या’ वेळेत सर्वांना पेट्रोल-डिझेल मिळणार

पुण्यात दारु घेण्यासाठी मद्यपींच्या वाईन शॉपसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत दिसले. यावेळी महिलाही वाईन शॉपच्या रांगेत उभी असल्याचं दिसलं. (Pune Liquor Shops near Containment Zones closed)

नियम आणि अटी

संध्याकाळी 6 नंतर मद्यविक्रीवर सर्व ठिकाणी पूर्णपणे बंदी असणार आहे.

घाऊक विक्रेत्यांना 50 टक्के कर्मचारीच ठेवण्यास परवानगी आहे.

मद्यविक्रीत केवळ सीलबंद मद्याच्या विक्रीलाच मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका, नगरपरिषद क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी आहे.

एकावेळी दुकानासमोर फक्त 5 ग्राहक असण्याचीही अट ठेवण्यात आली आहे.

दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचं अंतर असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

दुकानं व परिसर दर 2 तासांनी निर्जंतुक करण्याच्या सक्त सुचनाही मद्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

दुकानांमध्ये मद्यप्राशन करण्यावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

विशेष म्हणजे लॉकडाऊनचे नियम पाळण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदाराची असणार आहे.

 

(Pune Liquor Shops near Containment Zones closed)