पुणे : पुण्यात दहा दिवसाच्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शिथिलता देण्यात आली आहे (Pune Lockdown Rules Violation). रविवारी 8 ते 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, निर्बंध शिथिल झाल्यावर 698 नागरिकांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. 19 तारखेपासून 24 तासात तब्बल 698 जणांवर कारवाई करण्यात आली आहे (Pune Lockdown Rules Violation).
19 तारखेच्या सकाळी 5 वाजेपासून 20 तारखेच्या सकाळी 5 वाजेपर्यंतची ही कारवाई आहे. तर गेल्या 16 दिवसात 14 हजार 915 कारवाया करण्यात आल्या आहेत. पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र, या कारवायांवरुन काही पुणेकरांना अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
पुण्यात 224 अधिकारी आणि 1436 पोलीस तैनात
या कारवाईसाठी पोलिसांनी पुणे शहरात एक्झिट आणि एन्ट्री पॉईंटवर नाकाबंदी केली. या नाकाबंदीसाठी 224 पोलीस अधिकारी आणि 1436 पोलीस तैनात आहेत.
विनापरवाना मोकाट फिरणाऱ्या 148 नागरिकांवर कारवाई केली. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या 54 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. विनापरवाना फिरणाऱ्या वाहनचालकांची 44 वाहने जप्त केली. तर विना मास्क फिरणाऱ्या 64 बेफिकिरांवर कारवाई केली. तर विनामास्क वाहन चालवणाऱ्या एका नागरिकावर कारवाई केली.
188 अंतर्गत 288 नागरिकांवर कारवाई तर ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 11 जणांवर कारवाई केली. रॉंग साईड वाहन चालवणाऱ्या 88 जणांवर कारवाई केली (Pune Lockdown Rules Violation).
16 दिवसात 14 हजार 915 जणांवर कारवाया
गेल्या 16 दिवसापासून 14 हजार 915 कारवाया करण्यात आल्या आहेत. 4 तारखेपासून 20 तारखेच्या सकाळपर्यंतची ही कारवाई आहे. विनापरवाना फिरणाऱ्या 3 हजार 494 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
विना परवाना फिरणाऱ्या 970 वाहनचालकांवर, विना परवाना फिरणाऱ्या 1142 नागरिकांची वाहने जप्त केली. विना मास्क फिरणाऱ्या 2309 बेफिकीरवर आणि विना मास्क वाहन चालवणाऱ्यांची 191 वाहने जप्त केली. 188 अंतर्गत 5850 नागरिकांवर कारवाई केली तर ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 959 जणांवर कारवाई करण्यात आली.
होम क्वारंटाईनमधील कोरोनाग्रस्त महिला थेट दुबईत, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकारhttps://t.co/OuB71d7gnd #PimpriChinchwad #CoronaIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2020
Pune Lockdown Rules Violation
संबंधित बातम्या :
Pune Lockdown: 120 दिवस खूप सहन केलं, आता क्षमता संपली, लॉकडाऊनवाढीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध