पुणे : कोरोना काळात काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिले आकारले आहेत (Audit of Private hospital in Pune). त्यामुळे आतापर्यंत अनेक रुग्णांचा रुग्णालय प्रशासनासोबत वाद झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात गेल्या पाच दिवसांमधील खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी महापालिकेच्या लेखा परीक्षकांनी केली आणि तब्बल 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी करण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे (Audit of Private hospital in Pune).
महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखापालांनी 14 ते 18 ऑगस्ट या कालावधीत खासगी रुग्णालयांकडून आलेल्या 1 कोटी 18 लाख 43 हजार 997 रुपयांच्या बिलांची तपासणी केली. यामध्ये 36 बिलांमध्ये तब्बल 29 लाख 24 हजार 203 रुपयांची अतिरिक्त रक्कम लावली गेली असल्याचे आढळून आले. त्यामुळे लेखा परीक्षकांनी ही रक्कम संबंधित बिलांमधून वगळून 89 लाख 19 हजार 764 रुपयांचीच बिले मंजुर केली, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
कोरोना काळात राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे लक्ष घालत अतिरिक्त बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशा सूचना सरकारने दिल्या होत्या. नुकतेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही अतिरिक्त बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असं सांगितले होते.
संबंधित बातम्या :
Rajesh Tope | रुग्णालयात अधिक बील आकारल्यास कारवाई करणार : राजेश टोपे
श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना
N 95 असो किंवा कोणताही मास्क, ठरलेल्या किमतीतच विकावे लागतील, राजेश टोपेंनी ठणकावलं