पुणे : गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट आहे (Pune Police Bandobast For Ganeshotsav). त्यामुळे पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यंदा पुण्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यात तब्बल साडे सात हजारांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत (Pune Police Bandobast For Ganeshotsav).
गणेशोत्सवासाठी यंदा साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुमारे बारा हजार पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकांना परवानगी नसल्याने यावर्षी सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी आणि सातशे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी सज्ज होणार आहेत. आवश्यकतेनुसार, हा बंदोबस्त वाढविण्यात येईल, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली.
बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी करा, महापौरांचं आवाहन
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याबरोबरच गणपती बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी करण्याचे अवाहन महापौर मुरलीधर मोहोळ आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पत्रकार परिषदेत केले. पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त संभाजी कदम, मितेश गट्टे, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन उपस्थित होते (Pune Police Bandobast For Ganeshotsav).
कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्ण कमी होताना दिसत आहेत. गणेशत्सवामध्ये पावणे पाच लाख नागरिक गणपती बाप्पा बसवतात. त्या निमित्ताने विसर्जनाच्या दिवशी सुमारे 25 लाख नागरिक रस्त्यावर येतात. कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी पुणे महानगर पालिका आणि पुणे पोलीस यांनी संयुक्तिकरित्या पाऊले उचलली आहेत.
त्यामुळे गणपती बाप्पाला घरी आणणार्या नागरिकांना गणपती बाप्पाचे घरच्या घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. तर साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, गायक, दिग्दर्शकांच्या व्हिडीओ क्लिपद्वारे नागरिकांना साधे पणाने गणेशोत्सव साजरा करून गणेश मुर्तीचे विसर्जन घरच्या घरी करण्यासाठी आवहान आम्ही करत आहोत. नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पालिका आणि पोलिसांच्या आवाहाना प्रतिसाद द्यावा, अशी विनंती सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पुणेकरांना केली.
Pune Ganeshotsav | अनेक मंडळांचे बाप्पा मंदिरातच, तर मानाचे पाच गणपती मंडपात विराजमान होणारhttps://t.co/e0ZfJ4Ir23@PuneCityPolice #PuneGaneshotsav #Ganeshotsav2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 17, 2020
Pune Police Bandobast For Ganeshotsav
संबंधित बातम्या :
Pune Ganeshotsav | गणेशमूर्तीची खरेदी ऑनलाईन, मिरवणूक नाही, पुणे पोलिसांची नियमावली
कोरोना रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश