पुणे : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कर्फ्यू जारी केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश पुढील 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना घराबाहेर जाणे भाग आहे. अशातच पोलिस पित्याला घराबाहेर जाण्यापासून रोखणाऱ्या चिमुकल्याचा एक भावनिक व्हिडीओ समोर आला आहे. (Pune Police Child cry)
‘पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे’ असं हा चिमुकला आपल्या ड्युटीवर जाणाऱ्या पोलिस वडिलांना रडून सांगत आहे. लेकराचा आकांत पाहून पित्याचाही नाईलाज होताना दिसतो.
‘साहेबांचा फोन आला होता’ असं म्हणत बाप लेकराला कडेवर घेतो आणि छातीशी कवटाळतो. मी दोनच मिनिटात जाऊन येतो, असं म्हणताना वडिलांचा पाय निघत नाही. कर्तव्य सर्वश्रेष्ठ असते, हे समजावताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
माणिक घोगरे हे पुणे पोलिसात कार्यरत आहेत. पुण्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याने अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : पुण्यातील ‘कोरोना’मुक्त दाम्पत्यावर राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांची भावनिक कविता
पोलिस, डॉक्टर, नर्स यांच्याप्रमाणे विविध अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी दिवसरात्र तैनात आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करा, अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका, असं आवाहन ‘टीव्ही9 मराठी’ पुन्हा करत आहे.
पहा व्हिडीओ :
पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत pic.twitter.com/3awCGTw3fo
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2020
पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या ज्या दोन व्यक्ती अॅडमिट झाल्या होत्या, त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, त्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. ‘दुसऱ्या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्यांच्या पहिल्या टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, आज त्यांच्या दुसऱ्या टेस्ट घेत आहोत, त्या निगेटीव्ह आल्या तर त्यांनाही उद्या डिस्चार्ज दिला जाईल’, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतानाच सर्वांच्या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Pune Police Child cry)