पुणे : पुण्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पुणे मनपा आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातला (Pune Police Corona Virus) आहे. पुणे मनपाच्या तब्बल 60 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पुणे पोलीस दलातील 33 जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या 60 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली (Pune Police Corona Virus) आहे. त्यातील पाच कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये सर्वधिक नर्स आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यातील 26 जण बरे झाले आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अद्याप 29 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे मृतांच्या वारसांना एक कोटी रुपये किंवा महापालिकेत नोकरी देण्याचा मनपा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
तर पुणे पोलीस दलातील 33 जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली. तर कोरोनामुळे सहाय्यक फौजदारसह एका वाहतूक शाखेतील पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तर 20 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अद्याप 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांनी सहा हजाराचा टप्पा ओलांडला असून 6093 रुग्णसंख्या झाली आहे. तर शनिवारपर्यंत मृत्यूचा आकडा तब्बल 303 वर पोहोचला (Pune Police Corona Virus) आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत 24 तासात 192 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने 196 बाळ निगेटिव्ह
जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा
पुण्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार