मुकबधीर आंदोलकांवर गुन्हा दाखल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

पुणे : मुकबधीर आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केल्याची घटना आज पुण्यात घडली. या लाठीचार्जमुळे पुणे  पोलीसांवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. त्यातच आता पुणे पोलिसांनी त्या मुकबधीर आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा या आंदोलकांवर आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांच्या अध्यक्षांनी जमावाला भडकवल्याचा आरोप केला आहे. जमावाने […]

मुकबधीर आंदोलकांवर गुन्हा दाखल
Follow us on

पुणे : मुकबधीर आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केल्याची घटना आज पुण्यात घडली. या लाठीचार्जमुळे पुणे  पोलीसांवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. त्यातच आता पुणे पोलिसांनी त्या मुकबधीर आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा या आंदोलकांवर आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांच्या अध्यक्षांनी जमावाला भडकवल्याचा आरोप केला आहे. जमावाने बॅरिगेट्स बाजूला करुन पोलिसांना तुडवलं, यानंतर जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र जमाव नियंत्रणात येत नसल्याने लाठीचार्ज करावा लागला असे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांनी दिले. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

आंदोलकांनी फक्त धरणे आंदोलनाची परवानगी मागितली होती. मुंबई मोर्चाची परवानगी मागितली नव्हती. मात्र, ते मुंबईकडे निघाल्याने दिडशे जणांना ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, आमच्यावर आधी हल्ला झाला असून त्यात पोलीसही जखमी झालेत. जमावाला नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र, जमाव नियंत्रणात येत नसल्याने आम्हाला लाठीचार्ज करावा लागला, असेही पोलिसांनी सांगितले.

पुण्यातील समाज कल्याण कार्यालयात जाऊन हे तरुण आणि तरुणी त्यांच्या मागण्या मांडणार होते. त्यानंतर मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं पत्र दिलं जाणार होतं. त्याअगोदरच पोलिसांनी अडवणूक करत या दिव्यांगांवर अमानुषपणे लाठीचार्च केला. या मारहाणीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलकांची पुण्यात भेट घेतली. त्यांनी कठोर शब्दांत या घटनेचा निषेध केला असून हे फडणवीस सरकार नसून जनरल डायर सरकार आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. तर मूकबधीरांवर अशा प्रकारे अत्याचार करणं अत्यंत दुर्दैवी आहे. लाठीचार्जचा आदेश देणाऱ्याची चौकशी करावी, असे राज ठाकरे म्हणाले.

VIDEO :