पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात सध्या 21 दिवसांचा (Pune Police Tweet ) लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर अनेक उखाणे आणि मीम्स व्हायरल होत आहेत. पुणे पोलिसांनीही असाच एक उखाणा ट्टविटरवरुन ट्टविट केला आहे. पुणे पोलिसांच्या या ट्विटला महाराष्ट्र पोलिसांनी रिट्विटही (Pune Police Tweet ) केलं आहे.
तुळशीबाग, एफ सी रोड आणि सदाशिव पेठ
सगळीकडे जाऊया, मात्र लॉकडाऊननंतर भेट
तुळशीबाग, FC रोड आणि सदाशिव पेठ
सगळीकडे जाऊया पण लॉकडाऊन नंतर भेट #CoronaUkhana #lockdownindia #LockdownLessons— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 2, 2020
असा उखाणा पुणे पोलिसांनी ट्विट केला. अल्पावधीतचं पुणे पोलिसांचं हे ट्टविट अनेकांनी रिट्टविट केलं. तसेच महाराष्ट्र पोलिसांनीही ते रिट्विट केलं.
तिखट मिसळीवर घ्या एक वाटी तरी
लॉकडाऊनमध्ये राहा सुरक्षित घरी
तिखट मिसळीवर घ्या एक वाटी तरी
Corona पासून वाचण्यासाठी रहा आपल्या घरी #CoronaUkhana #LockdownLessons #lockdownindia https://t.co/3U1gJWFtVu— Maharashtra Police (@DGPMaharashtra) April 2, 2020
दररोज पकड़तो आम्ही गुंड आणि चोरांना
स्वच्छतेची काळजी घ्या होणार नाही #corona !#CoronaUkhana #LockdownLearnings https://t.co/2AXWIBQAs9— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 2, 2020
चितळे ची बाकरवडी सुजाताची मस्तानी
कोरोनाचा संसर्ग टळतो सगळे घरी बसल्यानी #CoronaUkhana https://t.co/xxLXUsXKYS— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 2, 2020
या उखाणाच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. पुणे पोलिसांचं हे ट्टविट सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
पुण्यात 121 ठिकाणी कडक नाकाबंदी
दरम्यान, पुण्यात गेल्या चार दिवसांपासून (Pune Police Tweet ) रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात अनेकजण भाजीपाला खरेदीसाठी दुचाकी किंवा वाहनाचा वापर करतात. मात्र, पुणेकरांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी किंवा किराणा दुकानात चालत जावे. दुचाकी किंवा वाहनाचा वापर करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे शहरात तब्बल 121 ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. तर लॉकडाऊननंतर 23 मार्चपासून पुण्यात कलम 188 अतंर्गत 1 हजार 896 जणांवर कारवाई केली आहे. तर आतापर्यंत 12 हजार 500 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या कालावधीत तब्बल 4 हजार 500 वाहनं जप्त करण्यात आली आहेत, अशी सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार
महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा चारशेच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात 81 रुग्ण वाढले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 416 वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यंत 17 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.
महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?
मुंबई – 238
पुणे – 44
पिंपरी चिंचवड – 15
सांगली – 25
नागपूर – 16
नवी मुंबई – 13
कल्याण – 10
ठाणे – 8
वसई विरार – 6
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
अहमदनगर – 17
बुलडाणा – 5
यवतमाळ – 4
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
नाशिक – 1
जळगाव- 1
हिंगोली – 1
इतर राज्य (गुजरात) – 1
एकूण 417
Pune Police Tweet
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |