पुणे : पुणेकरांसमोर कोरोनाबरोबरच खड्ड्यांची आणखी एक नवीन डोकेदुखी झाली आहे (Pune Pot Holes Problem). शहरातील एक हजार किलोमीटर डांबरीकरण असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सर्वच प्रभागांमध्ये खड्डे दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांबरोबरच पुण्यातून जाणाऱ्या रस्त्यांवर ही खड्डे पडले आहेत (Pune Pot Holes Problem).
आधीच पुणेकर कोरोनानं हैराण झाले आहेत. त्यातच आता पावसाळ्यातील खड्ड्यांमुळे आणखी एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना पावसासह खड्ड्यांचाही सामना करावा लागतो आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
शहरात चौदाशे किलोमीटरचा रस्ते आहे. एक हजार किलोमीटर डांबरीकरण असलेल्या रस्त्यांवर आता खड्डे पडू लागले आहेत. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये खड्डे पाहायला मिळत आहेत. हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी पालिकेनं 15 कोटींची निविदा मंजूर केली. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागात खड्डे दुरुस्तीसाठी वाहनांची व्यवस्था केली. मात्र, त्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत (Pune Pot Holes Problem).
शहरात ज्या पद्धतीनं खड्डे पाहायला मिळत आहेत. अगदी असेच खड्डे पुणे नाशिक, पुणे नगर, पुणे सोलापूर, पुणे सातारा आणि पुणे मुंबई या मार्गांवर सुद्धा दिसत आहेत. त्याचबरोबर ठीकठिकाणच्या उड्डाण पुलांना खड्ड्यांनी ग्रासलं आहे. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
या खड्ड्यांमुळे काहींचा बळीही गेला आहे. मात्र, खड्डे दुरुस्ती म्हणजे केवळ मलमपट्टी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एका रस्त्यावर दोनदा तीनदा डांबरीकरण केलं जातं. मात्र, खड्डे कायम राहत असून रस्तेसुद्धा ओबडधोबड बनतात. त्यामुळे खड्डे दुरुस्ती म्हणजे पैसे काढणे हाच मुख्य हेतू आहे. याप्रकरणी आयुक्तांनी गाडीतून खाली उतरुन रस्त्यांची पाहणी करावी, असं आवाहन नागरिकांनी केलं आहे.
थाटामाटात भूमीपूजन, दोन वर्ष उलटूनही पहिला हायब्रिड अँन्युटी प्रकल्प अपूर्ण, 80 कोटींचा मार्ग अद्याप रखडलेलाhttps://t.co/3CkAvMbV5c
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 16, 2020
Pune Pot Holes Problem
संबंधित बातम्या :
Maharashtra Rain | राज्यात पुढील पाच दिवस पाऊस, पूर्व विदर्भात रेड अलर्ट, पुणे-साताऱ्यात ऑरेंज अलर्ट