पुणे : राज्यात कोरोनाबाधितांसह कोरोना बळींचाही आकडा वाढत चालला (Pune Corona Patient Died) आहे. पुण्यात आज (2 मे) आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान एका 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा 100 वर पोहोचला आहे.
पुण्यातील घोरपडी परिसरात एका 68 वर्षीय संशयित रुग्णाला 21 एप्रिलला (Pune Corona Patient Died) ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट 24 एप्रिलला पॉझिटिव्ह आला होता. या कोरोनाबाधित रुग्णाचा 2 मे रोजी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. दरम्यान यामुळे पुण्यात कोरोनाबाधित मृत्यूंचा आकडा 100 वर पोहोचला आहे.
दरम्यान काल (1 मे) पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 115 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 815 वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात 7 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात काल 93 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 611 झाली आहे. सद्यस्थितीत पुण्यात अॅक्टिव रुग्ण 1195 आहे. यातील 64 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार पार
महाराष्ट्रात काल (1 मे) एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Pune Corona Patient Died) दिली.
संबंधित बातम्या :
Pune Corona : पुण्यात 24 तासात 7 कोरोनाबळी, रुग्णांची संख्या 1815 वर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 11,506 वर, आज एकाच दिवसात तब्बल 1008 रुग्णांची वाढ