पुणे : ससून रुग्णालयात दिवसभरात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एकट्या ससून रुग्णालयात आतापर्यंत 106 कोरोनाग्रस्त रुग्णांनी प्राण गमावले आहेत. ससूनमध्ये आज (17 मे) मृत्युमुखी पडलेले तिन्ही रुग्ण वयाची सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक होते. (Pune Sassoon Hospital Corona Patient Death)
ससून रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर एका रुग्णाला इथून आज डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत 112 रुग्णांना ससूनमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
कसबा पेठेतील 72 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्याला कोरोनासह उच्च रक्तदाबाची व्याधी होती. तर धनकवडी येथील 72 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब आणि किडनीचा आजार होता.
येरवडा येथील 70 वर्षीय कोरोनाबाधित महिलेलाही ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूने गाठले. तिला कोरोनासह उच्च रक्तदाबाची व्याधी जडली होती.
दरम्यान, ताडीवाल रस्ता भागात राहणाऱ्या 45 वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाला. त्याला आज ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
पुणे महापालिका हद्दीत एकूण 3 हजार 295 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर 185 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात तीन हजार 866 बाधित रुग्ण असून एकूण 197 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
VIDEO : Lockdown 4.0 | लॉकडाऊन-4 मध्ये राज्यात काय सुरु राहणार? https://t.co/kWaQcCZbrY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020