पुणे : टीव्हीवर कार्टून बघण्यास घरातल्यांनी विरोध केल्यामुळे पुण्यात एका 13 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा मुलगा बिबवेवाडीतील राजीव गांधी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. (Pune Teenage boy Commit suicide)
बिबबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी (Pune Teenage boy Commit suicide) दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा मंगळवारी सकाळपासून टीव्हीवर कार्टून बघत होता. काही वेळाने त्याच्या आई आणि आजीने टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा टीव्ही पाहू लागला.
तेवढ्यात त्याच्या बहिणीने हातातून रिमोट घेत टीव्ही बंद केला. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलगा वर राहणाऱ्या मामाच्या घरी गेला.
त्यानंतर घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ मुलगा बाहेर न आल्याने त्याच्या आईने दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना हा घडलेला सर्व प्रकार समोर आला. दरम्यान या मुलाचे वडील मद्यपी आहेत, तर आई गृहिणी आहे.
त्यानंतर त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केली. या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लट्टे करत आहेत. (Pune Teenage boy Commit suicide)
संबंधित बातम्या :
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, विषारी औषध पाजून मृतदेह पुरला, महाराष्ट्रात आणखी एक थरार