भवानी पेठ परिसरात सर्वाधिक, पुण्यात कोणत्या वॉर्डमध्ये किती कोरोनाग्रस्त?

| Updated on: Apr 10, 2020 | 3:40 PM

भवानी पेठ परिसरात सर्वाधिक 40 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, तर कसबा - विश्रामबाग वाडा भागात 18 रुग्ण आढळले आहेत (Pune ward wise Corona Patients)

भवानी पेठ परिसरात सर्वाधिक, पुण्यात कोणत्या वॉर्डमध्ये किती कोरोनाग्रस्त?
Follow us on

पुणे : राज्यावरील कोरोनाचं सावट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पुण्यात काल एका दिवसात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 25 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. सर्वच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. (Pune ward wise Corona Patients)

भवानी पेठ परिसरात सर्वाधिक 40 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कसबा – विश्रामबाग वाडा भागात 18, तर धनकवडी – सहकारनगरमध्ये 13 रुग्ण आहेत. कालच्या दिवसात 12 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 206 वर पोहोचली होती. तर, पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 181 इतकी आहे.

पुण्यातील वॉर्डनिहाय ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या (9 एप्रिलपर्यंत)

वॉर्ड – रुग्ण संख्या
औंध – बाणेर – 3
कोथरूड – बावधन – 1
सिंहगड रोड – 5
वारजे – कर्वेनगर – 1
धनकवडी – सहकारनगर – 13
कोंढवा – येवलेवाडी – 6
बिबवेवाडी – 4
हडपसर – मुंढवा – 13
वानवडी – रामटेकडी – 5
ढोले पाटील रोड – 16
भवानी पेठ – 40
कसबा – विश्रामबाग वाडा – 18
शिवाजीनगर – घोले रोड – 6
नगररोड – वडगावशेरी – 1
येरवडा – धनोरी – 6
पुण्याबाहेरील रुग्ण – 6

(Pune ward wise Corona Patients)