पुणे : पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाने विळखा घातला (Pune zilla parishad Corona Hotspot) आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यासह पत्नीला कोरोनाची बाधा झाली आहे. तर स्थायी समिती आणि पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सदस्यासह कुटुंबातील चौघांना कोरोना झाला आहे. त्यामुळे झेडपी मुख्यालयातील 600 कर्मचाऱ्यांपैकी 510 कर्मचारी होम क्वारंटाईन झाले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाने विळखा घातल्याने सोमवारी अत्यावश्यक सेवेतील केवळ 90 कर्मचारी मुख्यालयात कामावर असणार आहेत. तर इतर अनेक जण वर्क फ्रॉर्म होम करणार आहेत. आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याने सर्व झेडपीचे उद्या निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
धक्कादायक बाब म्हणजे झेडपीचा संपूर्ण आरोग्य विभाग होम आयसोलेशनमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या मुख्यालयातील 70 ते 80 अधिकाऱ्यांसह कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये (Pune zilla parishad Corona Hotspot) आहे.
आतापर्यंत ज्या झेडपीच्या सदस्यांना कोरोना झाला आहे, ते व्यक्ती आयडीएसपी सेल, कंटेन्ट मॉनिटरींग कॉल सेंटर आणि रूग्णालयातील बेड मॅनेजमेंट सेल-ग्रामीण भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले होते.
त्यामुळे झेडपी कार्यालय आणि कुटुंबाच्या संपर्कातील सर्वांची तपासणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खाते विभागाच्या प्रमुखांना कोविड टेस्टसाठी सुट्टी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी कार्यालयात उपस्थिती मर्यादित असणार आहे. आरोग्य व्यवस्थेशी निगडित विभागातील काही मोजकेच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
स्थायी समितीच्या आणि पाणीपुरवठा स्वच्छता समितीचा सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. या सदस्यांनी 16 जुलैला झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीला अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार समित्यांचे सभापती आणि अतिरिक्त सीईओ उपस्थित होते. यामुळे सर्व पदाधिकारी होम आयसोलेशनमध्ये आहेत. अतिरिक्त सीईओची स्वॅब टेस्ट करण्यात (Pune zilla parishad Corona Hotspot) आली आहे.
VIDEO : Special Report | मुंबई आवाक्यात; मात्र पुणे, ठाणे, औरंगाबादेत कोरोनाचा उद्रेकhttps://t.co/lEhNPH9qmy
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020
संबंधित बातम्या :
जुन्नरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे यांचे कोरोनाने निधन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू