‘प्यार तुने क्या किया’, ‘रोड’ फेम दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचं निधन

| Updated on: Jul 19, 2020 | 4:25 PM

मनोज बाजपेयी, विवेक ओबेरॉय, हंसल मेहता, अनुभव सिन्हा यासारख्या कलाकार-दिग्दर्शकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. / Director Rajat Mukherjee Dies

प्यार तुने क्या किया, रोड फेम दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचं निधन
Follow us on

जयपूर : ‘प्यार तुने क्या किया’, ‘रोड’ यासारख्या बॉलिवूडमधील गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन झाले. जयपूरमध्ये राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून मुखर्जी आजारी होते. (Pyaar Tune Kya Kiya Fame Bollywood Director Rajat Mukherjee Dies in Jaipur)

रजत मुखर्जी यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मनोज बाजपेयी, विवेक ओबेरॉय, हंसल मेहता, अनुभव सिन्हा यासारख्या कलाकार-दिग्दर्शकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

लॉकडाऊनमुळे रजत मुखर्जी जयपूरमधील आपल्या घरी गेले होते. या काळात त्यांना मूत्रपिंडासंबंधी तक्रारी जाणवू लागल्या. दोन महिन्यापूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती, मात्र प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


रजत मुखर्जी यांनी 2001 मध्ये ‘प्यार तुने क्या किया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात उर्मिला मातोंडकर, फरदीन खान, सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर 2004 मध्ये त्यांनी ‘लव्ह इन नेपाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्यात गायक सोनू निगम, राजपाल यादव आणि फ्लोरा सैनी मुख्य भूमिकेत होते. (Pyaar Tune Kya Kiya Fame Bollywood Director Rajat Mukherjee Dies in Jaipur)