भोपाळ: मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपकडून फटकारण्यात आले आहे. राहुल गांधी यांना शेती आणि शेतकऱ्यांबद्दल काय कळते? कांदा जमिनीच्या वर उगवतो की खाली, हे तरी त्यांना माहिती आहे का, असा रोकडा सवाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला. (Shivraj Singh criticise Rahul Gandhi)
शिवराजसिंह चौहान शुक्रवारी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंजाबमध्ये राहुल गांधी यांनी काढलेल्या ट्रॅक्टर यात्रेवर तोफ डागली. काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये संभ्रम का पसरवत आहे? राहुल गांधी ट्रॅक्टर सोफा लावून फिरत आहेत. शेतकरी किंवा शेतीबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. एवढंच काय कांदा जमिनीच्या वर उगवतो की खाली, हेदेखील त्यांना ठाऊक नसेल, अशी टीका शिवराजसिंह चौहान यांनी केली. तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
#WATCH Rahul Gandhi is roaming around in the tractor, sitting on a sofa. He doesn’t know a thing about farming. Rahul is not even aware whether onions are grown inside the soil or outside: Shivraj Singh Chouhan, Chief Minister, Madhya Pradesh pic.twitter.com/d2V0DwLael
— ANI (@ANI) October 9, 2020
गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. यावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार रणकंदन घडले होते. मात्र, मोदी सरकार संसदेत तिन्ही कृषी विधेयके मंजूर करवून घेण्यात यशस्वी ठरले होते. यानंतर काँग्रेसने रस्त्यावर उतरून या कृषी विधेयकांचा विरोध सुरु केला होता.
त्यासाठी काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. पंजाबच्या संगरुर ते भवानीगढपर्यंत काँग्रेसकडून ट्रॅक्टर यात्रा काढण्यात आली होती. राहुल गांधी ,पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
He made the entire state a center of corruption & middlemen. Farmers were cheated on pretext of loan waivers & Rs 6000 crores were not fully paid to them by the previous CM. He stopped all my previous schemes also: Shivraj Singh Chouhan, Madhya Pradesh CM on Former CM Kamalnath pic.twitter.com/vfgunkD2rd
— ANI (@ANI) October 9, 2020
संबंधित बातम्या:
‘…म्हणून कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी मी संसदेत उपस्थित नव्हतो’
मार्केट कमिटीचा सेझ बुडेल याची चिंता काँग्रेसला पडलीय काय?, कृषी विधेयकावरून चंद्रकांत पाटलांची टीका
केंद्राने कृषी कायदे पास करुन लोकशाहीचा गळा घोटला, काँग्रेसचा हल्लाबोल, राज्यपालांना निवेदन
(Shivraj Singh criticise Rahul Gandhi)