रायगड : अलिबाग तालुक्यात आज एकाच (Alibaug Corona Cases) दिवशी 11 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये अलिबाग शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी ही माहिती (Alibaug Corona Cases) दिली.
अलिबाग शहरातील कोळीवाडा येथील 51 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. या व्यक्तीची स्वॅब टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. याव्यतिरिक्त नारंगी येथे 4, सुडकोली येथे 2, तळवली येथे 3, परहूरपाडा येथे 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. या सर्वांचा कोविड-19 चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण बरे होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित 26 पॉझिटिव्ह (Alibaug Corona Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत कोरोनाग्रस्त वाढतेच, पाच वॉर्डमध्ये प्रत्येकी 2 हजाराहून अधिक रुग्ण https://t.co/wjHE4r6bm3 #Mumbai #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2020
रायगड जिल्ह्यात बाधितांची संख्या 840 वर
रायगड जिल्ह्यात काल (26 मे) नव्या 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 840 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 37 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांपैकी 482 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 54 हजारांच्या पार
राज्यात काल (26 मे) 2,091 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आकडा 54 हजार 758 वर पोहोचला. तर काल सर्वाधिक 97 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 1,792 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 1,168 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देणाऱ्यांची संख्या 16 हजार 954 इतकी झाली आहे. त्यामुळे सध्या 36 हजार 004 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Alibaug Corona Cases
संबंधित बातम्या :
रायगडमध्ये आणखी 39 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात बाधितांची संख्या 840 वर
सायन हॉस्पिटलची नर्स आणि तिच्या पतीविरोधात वर्ध्यात गुन्हा, प्रशासनाचा गंभीर आरोप
प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त
सातारा जिल्ह्याची धाकधूक वाढली, बारा तासात 58 नवे कोरोनाग्रस्त