रायगड : जिल्ह्यातील महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली (Raigad Mahad Building Collapse). येथे 5 मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) रात्री जमीनदोस्त झाली आहे. यात 41 कुटुंब राहत होते. त्यातील 18 जणांना बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर आणखी काही लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत (Raigad Mahad Building Collapse).
घटनास्थळी एनडीआरएफचं पथक दाखल होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांच्या मदतीने 7 जणांना बाहेर काढण्यात आलं होतं. यामध्ये 5 पुरुष तर 2 महिलांचा समावेश होता. मात्र, यापैकी एका पुरुषाचा मृत्यू झाला. एनडीआरएफचं पथक दाखल झाल्यानंतर 12 जणांना रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बाहेर काढण्यात आलं. मात्र, यापैकी 11 जण मृतावस्थेत सापडले. तर एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे.
दुर्घटनेत बारा जणांचा मृत्यू :
1)सय्यद अमित समीर, वय 45 वर्ष.
2) नविद झमाने, वय 35 वर्ष
3) नाैसिन नदीम बांगी, वय 30 वर्ष
4) आदी हाशिम शैकनग, वय 16 वर्ष
5) अनाेळखी स्री चा मृतदेह
6) रोशनबी देशमुख, वय 56 वर्ष
7) ईस्मत हाशिम शैकनक, वय 42 वर्ष
8) फातिमा अन्सारी, वय 40 वर्ष
9) अल्लतिमस बल्लारी, वय 27 वर्ष
10) शौकत आदम अलसूलकर, वय 50 वर्ष
पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकं महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. बचाव कार्यात साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फार्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांचा मोलाचा वाटा आहे.
मृत नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा
मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लोकांचे जीव गेले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन होईल. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येतील. जखमींना पन्नास हजार रुपयांची दिले जाणार. या घटनेत ज्यांनी आपलं घर गमावलं आहेत त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
LIVE UPDATE :
Saddened by the building collapse in Mahad, Raigad in Maharashtra. My thoughts are with the families of those who lost their dear ones. I pray the injured recover soon. Local authorities and NDRF teams are at the site of the tragedy, providing all possible assistance: PM
— PMO India (@PMOIndia) August 25, 2020
Maharashtra: Search & rescue operation by National Disaster Response Force (NDRF) underway at the spot where a building collapsed in Kajalpura area of Raigad district y’day. (Image source: NDRF)
As per Raigad District Collector, 2 deaths reported so far, 18 still feared trapped. pic.twitter.com/lYEc0DnhDW
— ANI (@ANI) August 25, 2020
“एनडीआरएफचे तीन पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 60 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप 25-30 जण अडकल्याची शक्यता आहे”, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
Maharashtra Ministers Aditi Tatkare & Eknath Shinde arrive at the spot where a building collapsed in Kajalpura area of Raigad district last evening. Rescue operation underway. Aditi Tatakare says, “Around 60 people rescued, 25-30 are still feared to be trapped under the debris.” pic.twitter.com/TA5AT7jRP9
— ANI (@ANI) August 25, 2020
इमारत कोसळण्याची कारणं काय?
इमारतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बेसमेंटच्या पिलरची रुंदी ही इमारतीच्या अन्य पिलरच्या रुंदी एवढीच होती. महाड शहरातील काजळ पुरा मोहल्ल्यामधील हापुस तलाव या भागामध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीच्या परिसरामध्ये दरवर्षी पुराचे पाणी वेढले जात असताना या तकलादू पिलरवर संपूर्ण इमारतीचा भार पेलणे कठीण होते. महाड शहरातील पूरस्थितीमुळे अनेक इमारती अशा पद्धतीने केवळ पिलर्सवर उभ्या असून पुराच्या पाण्यामुळे चार तासांपेक्षा अधिक काळ भिजून या पिलर्समधील स्टील गंजून कमकुवत होते. त्यावरील इमारतीचा भार सहन न झाल्याने अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते.
दोषींवर कारवाई केली जाईल – एकनाथ शिंदे
ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. ही इमारत पत्त्या सारखी कोसळली आहे. अजून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. अगदी निकृष्ट दर्जाचे काम केलं होतं. जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे जखमी आणि मृत पावले आहेत त्यांना सरकारकडून योग्य मदत दिली जाईल. शहरात ज्या जुन्या इमारती आहेत, त्यासाठी क्लस्टर योजना आणली आहे.
Raigad Mahad Building Collapse
संबंधित बातम्या :
Mahad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु