सोलापूर : जिल्ह्यासह सोलापूर शहरामध्ये जोरदार पाऊस सुरूच आहे. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला असून वैराग जवळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोलापुरातील कारंबा येथील ओढा देखील भरून वाहत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. कुरनूर धरणाच्या 6 दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील ओढे वाहत आहेत. कल्याणनगर भागातील 25 ते 30 घरात पाणी शिरले आहे. (Rain continue in Solapur water come on road water released from Kurnur dam)
[svt-event title=”कल्याणनगर भागातील 25 ते 30 घरामध्ये गुडघाभर पाणी” date=”14/10/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ]
#सोलापूर : कल्याणनगर भागातील 25 ते 30 घरामध्ये गुडघाभर पाणी, संसारोपयोगी साहित्याच्या मोठं नुकसान, संतप्त नागरिकांडून आसरा चौकात रास्ता रोको, अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप pic.twitter.com/aASePztcki
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
[svt-event title=”अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील सर्व ओढे नाले वाहू लागले” date=”14/10/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]
#सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील सर्व ओढे नाले भरून वाहू लागले. पाण्यामुळं शेतीला तळ्याचे स्वरूप, पावसाची रात्रीपासून धुवांधार बॅटिंग सुरू, लॉकडाऊन नंतर पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पहिल्यांदा ठप्प pic.twitter.com/dXPsFepkvl
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. वैराग शहराला पाणीपुरवठा करणारा हिंगणी प्रकल्प नुकताच ओव्हरफ्लो झाला होता. पावसामुळे वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेल्यामुळं या रस्त्यावरिल वाहतूक बंद झाली आहे.
कारंबा येथील ओढा ओव्हर फ्लो झाल्यामुळं नागरिकांनी पाण्यातून वाट काढत जीवघेणा प्रवास सुरू आहे. दूधविक्रेत्यांनी जीव धोक्यात घालून या ओढ्यातून शहराकडे प्रवास केला. सध्या कारंबा येथील ओढ्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे.
पावसामुळे अक्कलकोट जूना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज 373 वर्षांनी ढासळला आहे. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र)यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती केली होती.
#सोलापूर – कारंबा येथील ओढा ओव्हरफ्लो, पाण्यातून वाट काढत नागरिकांचा जीवघेणा प्रवास, कारंबा नाका येथील दूधविक्रेत्यांचा जीव धोक्यात घालून शहराकडे प्रवास, ओढ्यावरुन पाण्याचा मोठा प्रवाह सुरु pic.twitter.com/psEu1W639S
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं अनेक धरण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. कुरनूर धरण क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानं धरणाच्या सहा दरवाजातून 1800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
#सोलापूर– कुरनूर धरणक्षेत्रात रात्रीपासून पाऊस सुरु, धरणाचे सहा दरवाजे उघडले, 1800 क्सूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु, परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा pic.twitter.com/utAdXmBgXq
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्ह फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला होता. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. यामुळे वैराग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला होता. भोगावतीला पूर आल्यानं रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाने पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन सह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.
सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो, भोगावती नदीला पूर
Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात
(Rain continue in Solapur water come on road water released from Kurnur dam)