पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला बँडेज पाहून शालेय विद्यार्थिनीही कळवळली. ‘राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या?’ असा निरागस प्रश्न विद्यार्थिनीने विचारताच राज ठाकरे गालात हसले आणि पुढे गेले. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून ‘टेनिस एल्बो’ने त्रस्त (Raj Thackeray Tennis Elbow) आहेत.
राज ठाकरेंच्या आगमनामुळे पुण्यातील मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया हायस्कूलमध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीही होत्या. पत्रकार परिषद आटपून राज ठाकरे गर्दीच्या दिशेने आले तेव्हा एका विद्यार्थिंनीने त्यांच्या हाताकडे पाहून काळजी व्यक्त केली.
“राजसाहेब हाताला काय झालं? तो खूप दुखतोय का? त्यावर राज यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. तेवढ्यावर न थांबता ती म्हणाली, राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या? त्यावर राज गालात हसले आणि पुढे गेले.
आईच्या डोळ्यात अश्रू, हात धरुन राज ठाकरेंना गाडीपर्यंत सोडलं
राज ठाकरे यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोचा त्रास आहे. त्यांच्या हातावर मुंबईत उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या हाताला बँडेज दिसत आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही हा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून काही काळ दूर राहावं लागलं होतं.
टेनिस एल्बो म्हणजे काय?
कोपरापासून दंडाच्या दिशेने जोडलेले स्नायू सुजले तर मनगट उचलण्यासाठी, किंवा हालचाल करण्यासाठी वेदनादायी ठरतं. मनगटाचा वापर होणारी साधी कामं करतानाही अडचणी येतात. टेनिस किंवा बॅडमिंटन यासारखे खेळ सातत्याने खेळणाऱ्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. यावरुनच या दुखापतीला टेनिस एल्बो (Raj Thackeray Tennis Elbow) म्हटलं जातं