समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा हे काम करा, काय म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Oct 13, 2024 | 1:19 PM

राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा मेळाव्यात जोरदार भाषण केले आहे. आपल्या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना आणि विषयांना हात घातला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपल्या मार्मिक शब्दात टीका केली आहे.

समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा हे काम करा, काय म्हणाले राज ठाकरे
raj thackeray melawa
Follow us on

राज ठाकरे यांनी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याविषयी राज्य सरकारचे कान टोचले आहेत. त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा समुद्रात उभारणे किती अयोग्य आहे हे आपल्या भाषणात सांगितले. या पूर्वीही त्यांनी अनेकदा समुद्रात पुतळा उभारण्याविषयी आपले मत मांडले आहे. शिवरायांचा पुतळा समुद्रात उभाच राहू शकत नाही असे सांगत राज ठाकरे यांनी याविषयीचे कारणही आपल्या भाषणात सांगितले आहे.

राज ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हलाल की समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा अशी मागणी मागे झाली होती. विनायक मेटे यांनी ती मागणी केली होती. स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच पुतळा हवा. हे कोणी त्यांच्या डोक्यात घालतं माहीत नाही. मी अमेरिकेचा तो पुतळा पाहिला, फ्रान्ससरकारने अमेरिकेला दिला होता. तो दगडी आयलँडवर आहे. आता एवढा उंच पुतळा झाला. मला शिल्पकला माहीत आहे. जर पुतळा एवढा करायचा तर  घोडा केवढा झाला? असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

गडकिल्ल्यांवर हा पैसा खर्च करा

ते पुढे म्हणाले की तुम्ही  म्हणाल पटेलांचा पुतळा झाला. एका बाजूला चायनाला विरोध करायचा. चीनचे प्रोडक्ट घेऊ नका म्हणून सांगायचं आणि चीनमधून पटेलांचा पुतळा आणायचा. समजा उद्या पुतळा बनवला. पहिल्यांदा समुद्रात जी भर घालावी लागेल ती किती घालावी लागेल. सिंधुदुर्गातील पुतळा वाऱ्याने पडला. तो काही फार मोठा नव्हता. म्हणजे शिल्पकला ही गोष्ट समजून घ्या. नुसता पुतळा उभा करायचा नसतो. उद्या समुद्रातील भराव खचला. पुतळा हलला. भराव टाकून पुतळा उभा करायचा असेल तर किमान १५ ते २० हजार कोटी खर्च करावे लागेल. समुद्रात पुतळा उभा करण्यापेक्षा हे १५ ते २० हजार कोटी गडकिल्ल्यांवर खर्च केले तर राजा कोण होता, त्याने काय बांधलं हे सांगता येईल असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.