मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना संसर्गाची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढण्यामागील कारणंही सांगितली (Situation of Corona infection in Maharashtra). महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना चाचणी करणारं राज्य आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात 33 हजार चाचण्या केल्या आहेत. यात एकट्या मुंबईत 19 हजार चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढणं साहजिक आहे, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.
राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1652 वर पोहचली आहे. ही जी एकंदर संख्या आपल्याला वाढलेली दिसते आहे ती संख्या वाढलेली आहे, मात्र त्यामागील पार्श्वभूमी देखील समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना चाचणी करणारं राज्य आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात 33 हजार चाचण्या केल्या आहेत. यात एकट्या मुंबईत 19 हजार चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे साहजिक आहे की आपण खूप चाचण्या केल्यानंतर एकही रुग्ण सुटत नाही.
आपण सर्व प्रोटोकॉल पाळत चाचण्या घेतल्या आहेत. आपण थ्री टी म्हणजेच ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट अशा पद्धतीने काम करत आहोत. संशयित रुग्णांचं ट्रेसिंग करताना महाराष्ट्राने लाखोंच्या संख्येने लोक शोधली आणि त्यांची टेस्टिंग केली आहे. यामुळे आपल्याकडे संख्या वाढलेली दिसते. परंतू यातली जमेची बाजू म्हणजे यातील 70 टक्के रुग्ण अत्यंत सामान्य स्थितीत आहेत. यातील 5 टक्के गंभीर आहेत. बाकीचे मधल्या रुग्णांना साधारण लक्षणं दिसत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.
“मुंबई, पुणे आणि ठाणे पालघर परिसरातच 91 टक्के रुग्ण”
राजेश टोपे म्हणाले, “रुग्णांच्या संख्येतील वाढ 13 टक्के आहे. त्याची कारणं वरील प्रमाणे आहेत. हे रुग्ण साधारणपणे मुंबई, पुणे आणि ठाणे पालघर परिसरातच आहेत. त्याचं प्रमाण 91 टक्के आहे. एकट्या मुंबईत 61 टक्के आहेत, पुण्यात 20 टक्के आहेत. उर्वरित 9 टक्के ठाणे आणि पालघर भागात आहेत. या 3 भागाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात 9 टक्के रुग्ण आहेत. आपला मृत्यूदर 5.5 टक्के इतका आहे.”
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम सुरु आहे. रुग्णालयांमध्ये आपण तीन प्रकार करतो आहोत. एक कोविड केअर सेंटर. यात 100 सामान्य स्थितीतील रुग्ण असतील. दुसऱ्या प्रकारचं रुग्णालय कोविड हेल्थ सेंटर असेल. त्यात माईल्ड स्वरुपाचे रुग्ण ठेवले जातील. तिसऱ्या कोविड रुग्णालयात गंभीर स्वरुपाचे रुग्ण असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सर्व जिल्ह्यांमध्ये टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचार केले जाऊ शकतील.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 11, 2020
राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
संबंधित बातम्या :
Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?़
‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’
लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे
लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे
Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन
पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?
Situation of Corona infection in Maharashtra