कोरोना रुग्णांच्या करमणुकीसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड, अहमदनगरमध्ये 1000 बेडचं अद्ययावत कोव्हिड सेंटर

| Updated on: Aug 17, 2020 | 5:49 PM

आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने पारनेरमध्ये 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केले आहे (Parner COVID Centre by MLA Nilesh Lanke).

कोरोना रुग्णांच्या करमणुकीसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड, अहमदनगरमध्ये 1000 बेडचं अद्ययावत कोव्हिड सेंटर
Follow us on

अहमदनगर : आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने पारनेरमध्ये 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केले आहे (Parner COVID Centre by MLA Nilesh Lanke). यात कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये खास रुग्णांसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड अशा अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज (17 ऑगस्ट) त्याचे उद्घाटन करण्यात आले.

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर येथे हे भव्य कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. याचं उद्घाटन करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ” या कोव्हिड सेंटरमध्ये अतिशय उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. येथे अनेक बारकावे विचारात घेण्यात आले आहेत. येथील वातावरण पाहून बाधित पेंशटला अजिबात भीती वाटणार नाही. शरद पवार यांच्या विचाराला पोषक असं हे काम आहे. येथे रुग्णांच्या करमणुकीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.” कोव्हिड सेंटरमधील सुविधांचं टोपे यांनी भरपूर कौतुक केलं.


आमदार निलेश लंके म्हणाले, “या सेंटरमध्ये सकाळी उठल्यानंतर प्रत्येक रुग्णाला अंडे, दूध देण्यात येणार आहे. तसेच दुपारी आणि सायंकाळी जेवण असणार आहे. योगा शिबिर सुद्धा वेळोवेळी घेतले जाणार आहे. दररोज सायंकाळी कोरोना बाधितांसाठी भजन, भारुड असे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. हे कार्यक्रम घेताना फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाणार आहे. येथे प्रत्येक रुममध्ये प्रोजेक्टर बसवण्यात आले आहे. बाधितांच्या करमणुकीसाठी मोबाईल गेम, कॅरम बोर्ड ठेवले आहेत. एकंदरीत बाधितांना आनंदी ठेवण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.”


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या देखील या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं, “कर्जुले, पारनेर येथे आज आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर (कोव्हिड सेंटर) लोकार्पण सोहळ्यास ऑनलाईन उपस्थित होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उद्घाटन केले.”

हेही वाचा :

खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील 20 दिवस क्वारंटाईन राहणार

कोरोना होऊन गेल्यानंतर अन्य आजार लवकर होत नाहीत, संशोधकांचा दावा

कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांचा नकार, मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला